नागपूरचा पारा १२.८ अंशांखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:12+5:302021-02-05T04:59:12+5:30

नागपूर : विदर्भातील तापमानाचा पारा गेल्या दोन दिवसात चांगलाच खालावला आहे. नागपुरातील हवेत दिवसभर गारवा होता. शहराचे किमान तापमान ...

Nagpur's mercury is below 12.8 degrees | नागपूरचा पारा १२.८ अंशांखाली

नागपूरचा पारा १२.८ अंशांखाली

नागपूर : विदर्भातील तापमानाचा पारा गेल्या दोन दिवसात चांगलाच खालावला आहे. नागपुरातील हवेत दिवसभर गारवा होता. शहराचे किमान तापमान १२.८ अंशांवर होते, तर गोंदीयातील किमान तापमान सर्वात कमी म्हणजे ९.२ अंश सेल्सिअसवर होते.

नागपुरात गेले दोन दिवसांपासून गारवा चांगलाच वाढला आहे. शहरातील किमान तापमान गेल्या २४ तासात ३.१ अंशाने घसरून १३.५ अंशावर आले आहे. या बदलामुळे थंडी पुन्हा परतली असृून नागरिकांच्या प्रकृतीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. सकाळपासूनच शहरातील वातावरण थंडावलेले होते. सकाळी आर्द्रता ४२ टक्के नोंदविली गेली, तर सायंकाळी ती घटून ३२ टक्क्यांवर पोहोचली. दृष्यता ४ ते १० किलोमीटर होती. आकाशात ढग नसले तरी दोन दिवसांपूर्वीच्या पावसामुळे वातावरण चांगलेच थंडावले आहे. थंडीमुळे अनेक जण दुपारीही उन्हाचा आनंद घेताना दिसले.

नोहमीप्रमाणे विदर्भात गोंदीया शनिवारीही थंड होते. तेथील पाऱ्यात किमान ३.१ अंशाने घट झाली. पारा ९.२ अंश सेल्सिअसवर होता. यासोबतच वर्ध्यामध्येही १२.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला आणि यवतमाळात १३ अंश, बुलडाणा आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी १३.३ आणि १३.८ अंशावर पारा होता. गडचिरोलीत १४ अंश, तर वाशिममध्ये १५.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

Web Title: Nagpur's mercury is below 12.8 degrees