नागपूरचा पहिला ‘स्मार्ट’ बसस्टॉप बेलतरोडीमध्ये सुरू; चार्जिंग, आराम, आणि फॅन

By शुभांगी काळमेघ | Updated: June 2, 2025 18:47 IST2025-06-02T18:46:13+5:302025-06-02T18:47:28+5:30

बसची वाट पाहणं आता सुखकर : नागपूरकरांना मिळाली स्मार्ट सुविधा

Nagpur's first 'smart' bus stop opens in Beltarodi; Charging, comfort, and fan | नागपूरचा पहिला ‘स्मार्ट’ बसस्टॉप बेलतरोडीमध्ये सुरू; चार्जिंग, आराम, आणि फॅन

Nagpur's first 'smart' bus stop opens in Beltarodi; Charging, comfort, and fan

शुभांगी काळमेघ 
नागपूर :
नागपूरकरांसाठी एक दिलासादायक आणि आधुनिक सोयीने युक्त सुविधा आता उपलब्ध झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील बेल्टरोडी येथे पहिल्या स्मार्ट बस स्टॉपचे उद्घाटन करण्यात आले आहे. बेसे-पिपला नगर पंचायत क्षेत्रातील या बस स्टॉपमध्ये शेडमध्ये बसण्याची व्यवस्था, पंखे, मोबाइल चार्जिंग पॉइंट्स आणि लवकरच वॉटर कूलर सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. 

या स्मार्ट बस स्टॉपच्या बांधकामासाठी सुमारे रु. ६.५ ते रु. ७ लाख खर्च आला आहे. या सुविधेमुळे स्थानिक नागरिकांना चांगला अनुभव मिळणार असून, भविष्यात अशा सुविधा इतर ठिकाणीही सुरू करण्याचा विचार आहे.

या स्मार्ट बसस्टॉपचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रवाशांसाठी शेडमध्ये आरामदायक बसण्याची व्यवस्था, सीलिंग फॅन, मोबाईल चार्जिंगची सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. शहरात उन्हाळ्यातील तीव्र तापमान लक्षात घेता ही सोय प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक स्थळांवर अशा मूलभूत आणि अत्यावश्यक सुविधा आजही अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. मात्र, बेसे-पिपला नगर पंचायतने घेतलेला हा पुढाकार आधुनिक नागपूर घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.


 

Web Title: Nagpur's first 'smart' bus stop opens in Beltarodi; Charging, comfort, and fan