नागपूरची डिजिटल झेप ! ७१ टक्के वीजबिले आता ऑनलाईन

By आनंद डेकाटे | Updated: April 9, 2026 18:12 IST2026-04-09T18:12:32+5:302026-04-09T18:12:56+5:30

Nagpur : महावितरणला ३६४० कोटींचा महसूल; डिजिटल व्यवहारांतूनच २८२८ कोटींची भर

Nagpur's digital leap! 71 percent electricity bills now online | नागपूरची डिजिटल झेप ! ७१ टक्के वीजबिले आता ऑनलाईन

Nagpur's digital leap! 71 percent electricity bills now online

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
डिजिटलायझेशनच्या युगात नागपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, महावितरणच्या महसूल संकलनात डिजिटल माध्यमांचा मोठा वाटा दिसून आला आहे. नुकत्याच संपलेल्या २०२५-२६ आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तब्बल ७१.०३ टक्के लघुदाब ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरले, तर एकूण महसुलापैकी ७७.२३ टक्के रक्कम डिजिटल माध्यमातून जमा झाली आहे.

महावितरणच्या आकडेवारीनुसार, वर्षभरात नागपूर जिल्ह्यात १ कोटी ५३ लाख ६३ हजार ३९० व्यवहारांमधून ३६४०.८६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. यापैकी १ कोटी ११ लाख ३९ हजार ११६ व्यवहार ऑनलाईन झाले असून, त्यातून २८२८.२३ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले.

नागपूर शहर मंडळात ऑनलाईन बिल भरण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, येथे ७४.५७ टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी डिजिटल पर्यायाचा वापर केला. या माध्यमातून २३४३.५६ कोटी रुपये, म्हणजेच एकूण महसुलाच्या ७६ टक्के रक्कम जमा झाली.

ग्रामीण भागातही डिजिटल व्यवहारांचा वेगाने प्रसार होत असल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण मंडळातील ६७.५० टक्के ग्राहकांनी ५८४.६७ कोटी रुपयांचा भरणा ऑनलाईन केला. ही वाढ ग्रामीण भागातील वाढती तांत्रिक साक्षरता आणि डिजिटल सुविधांवरील विश्वास अधोरेखित करणारी आहे.

एकेकाळी बिल भरणा केंद्रांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता जवळपास इतिहासजमा होताना दिसत आहेत. जिल्ह्यात केवळ २८.९८ टक्के ग्राहकांनी ऑफलाईन पद्धतीने (रोख किंवा चेक) बिल भरले असून, महसुलातील त्यांचा वाटा २२.७६ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे.

महावितरणने ग्राहकांसाठी www.mahadiscom.in वेबसाइट, ‘महावितरण’ मोबाइल ॲप, महापॉवर पे आणि इतर पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन बिल भरणाऱ्यांना दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत, मुदतीपूर्वी भरणाऱ्यांना ‘तत्पर देयक सवलत’, तसेच ‘गो-ग्रीन’ पर्याय स्वीकारल्यास वार्षिक १२० रुपयांची अतिरिक्त सवलत दिली जाते.

“डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असून ही प्रक्रिया पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे उर्वरित ग्राहकांनीही डिजिटल पर्याय स्वीकारावा.
- दिलीप दोडके, मुख्य अभियंता,नागपूर परिमंडल महावितरण

Web Title : नागपुर की डिजिटल छलांग: 71% बिजली बिल अब ऑनलाइन

Web Summary : नागपुर में बिजली बिलों के ऑनलाइन भुगतान में उछाल आया है। 71% कम वोल्टेज वाले उपभोक्ता डिजिटल रूप से भुगतान करते हैं, जिससे 77% राजस्व प्राप्त होता है। नागपुर शहर 74% ऑनलाइन अपनाने के साथ आगे है, जबकि ग्रामीण क्षेत्रों में बढ़ती डिजिटल साक्षरता दिख रही है। महावितरण ऑनलाइन भुगतान के लिए प्रोत्साहन प्रदान करता है।

Web Title : Nagpur's digital leap: 71% electricity bills now online.

Web Summary : Nagpur sees a surge in online electricity bill payments. 71% of low-voltage consumers pay digitally, contributing 77% of revenue. Nagpur city leads with 74% online adoption, while rural areas show increasing digital literacy. MahaVitaran offers incentives for online payments.