शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात व्यवसायिकास ६९.४६ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:08 IST

एका खासगी कंपनीच्या चार संचालकांनी एचडीएफसी बँकेच्या एका अधिकाऱ्याशी संगनमत करून एका व्यक्तीला ६९ लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीचे हे प्रकरण पोलिसांकडे पोहचल्यानंतर आता मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देजियो ट्रेंचलेस कंपनीच्या संचालकावर गुन्हा : बँक अधिकारीही अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका खासगी कंपनीच्या चार संचालकांनी एचडीएफसी बँकेच्या एका अधिकाऱ्याशी संगनमत करून एका व्यक्तीला ६९ लाखांचा गंडा घातला. दीड वर्षांपूर्वीचे हे प्रकरण पोलिसांकडे पोहचल्यानंतर आता मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.बंधूनगर, झिंगाबाई टाकळी येथील गणेश गंगाप्रसाद तिवारी (वय ५२) यांनी एचडीडी मशीन खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सदर शाखेकडे कर्ज प्रकरण सादर केले होते. बँकेने त्यांना ५४ लाख ४६ हजारांचे कर्ज मंजूर केले. ही एचडीडी मशीन त्यांना आरोपी सचिन शर्मा (संचालक, जियो ट्रेचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.), मनीषा सचिन शर्मा (संचालक, जियो ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.), राजेश (संचालक, जियो ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.) आणि शिल्पी चव्हाण (संचालक, जियो  ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.) यांच्याकडून६९.४६ लाखांत घ्यायचे ठरले होते. त्यासाठी त्यांनी जियो ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.च्या उपरोक्त संचालकांकडे १५ लाख रुपये जमा केले होते. १० सप्टेंबर २०१६ ते ३ जुलै २०१७ या कालावधीत हा व्यवहार झाला होता. उपरोक्त आरोपींनी कर्ज प्रकरण हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून आपल्या खात्यात ५४ लाख ४६ हजार रुपये जमा करून घेतले. आता अनेक महिने होऊनही मशीन मात्र तिवारी यांना दिलीच नाही. जियो ट्रेंचलेस इक्वीपमेंट प्रा.लि.च्या उपरोक्त संचालकांनी बँक अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून आपली फसवणूक केल्याचे ध्यानात आल्याने तिवारी यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशीनंतर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.मेड इन चायना!तिवारी भूमिगत केबल टाकण्याचे काम करतात. आरोपींशी संपर्क आल्यानंतर त्यांनी तिवारींना चायना मेड एचडीडी मशीन मागवून देतो, असे सांगितले होते. मात्र, संपूर्ण रक्कम घेतल्यानंतरही मशीन उपलब्ध करून दिली नाही. दुसरीकडे ही मशीन आली की नाही आली, त्याची कोणतीही शहानिशा न करता बँक अधिकाऱ्यांनी ५४.४६ लाखांची रोकड आरोपींच्या खात्यात वळती केली. मेड इन चायना नावाप्रमाणे मशीनचा सर्व व्यवहार कागदावरच पार पडला.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा