शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर जिल्हा परिषदेचा आर्थिक विभाग ‘रिक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 21:18 IST

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात रिक्त पदांमुळे आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. वित्त अधिकाऱ्यापासून, सहा. वित्त अधिकारी व कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनसारखी कामे अडून पडली आहेत.

ठळक मुद्देलेखा अधिकारी प्रभारीवर : पाच पंचायत समितीतही लेखाधिकारी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात रिक्त पदांमुळे आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. वित्त अधिकाऱ्यापासून, सहा. वित्त अधिकारी व कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनसारखी कामे अडून पडली आहेत.वित्त विभागात दोन राजपत्रित अधिकाऱ्यांची व नऊ कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकरे यांची अवघ्या पाच महिन्यात विनंतीवरून नागपूर सुधार प्रन्यासमध्ये बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांचा प्रभार वर्ग - २ च्या अधिकाऱ्याकडे दिला आहे. सहा. लेखा अधिकारी राजपत्रित अधिकारी वर्ग - २ चे पदही गेल्या आठ महिन्यांपासून अरविंद पावडे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहे. २२ सप्टेंबर २०१७ च्या पदोन्नती समितीने नऊ कनिष्ठ लेखा अधिकारी व सहायक लेखा अधिकाऱ्यांच्या जागा ताबडतोब पदोन्नतीने भरण्याचे कॅफोला निर्देश दिले होते. परंतु नऊ कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांची रिक्त पदे जी वित्त विभाग मुख्यालयात चार, पं.स. नागपूर, पारशिवनी, काटोल, नरखेड, कामठी येथे गेल्या वर्षीपासून रिक्त आहे. जि.प.च्या सर्वच विभागांचा कारभार हा वित्त विभागाशी संबंधित आहे. विभागाची खरेदी, कंत्राटदारांच्या कामाचे परतावे, कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनधारकांची पेन्शन आदी कामे वित्त विभागातून केली जातात.वित्त सभापतीही त्रस्तवित्त विभागातील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे बरीच कामे खोळंबली असल्याची ओरड वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी सुद्धा केली आहे. ज्या अधिकाऱ्यांची बढती अथवा बदली झाली आहे, त्यांना मुख्यालयात रुजू करावे, अशी मागणी वित्त सभापतींनी सीईओंकडे केली आहे. भ्रष्टाचाराचे कुरणज्या वर्ग-२ च्या अधिकाऱ्याला कॅफोचा प्रभार दिला आहे. त्या अधिकाऱ्यावर नागपूर जिल्हा परिषद पेन्शनर महासंघाचे कार्याध्यक्ष एन.एल. सावरकर यांनी आक्षेप घेतला आहे. हे अधिकारी आपल्या दालनात ठेकेदारांना घेऊन बसतात. ठेके दारांची बिले पास करण्यात त्यांचे एकमात्र लक्ष आहे. सहा. लेखा अधिकारी यांचे पद रिक्त असल्यामुळे वर्ग-२ अधिकाऱ्याकडेच अतिरिक्त कार्यभार नियमाप्रमाणे सोपविण्यापेक्षा कॅफोने एका वर्ग -३ च्या प्रभारी कॅफोच्या मर्जीतील कर्मचाऱ्याला जबाबदारी सोपविली आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर