अखेर नागपूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 21:05 IST2020-05-22T21:01:09+5:302020-05-22T21:05:17+5:30
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात होतात. यावर्षी राज्य सरकारने जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहे. ग्रामविकास विभागाने त्यासंदर्भातील पत्र काढले आहे.

अखेर नागपूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरवर्षी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात होतात. यावर्षी राज्य सरकारने जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहे. ग्रामविकास विभागाने त्यासंदर्भातील पत्र काढले आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शासन यंत्रणा व्यस्त आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्यामुळे बदल्या रद्द करून त्यावर खर्च होणारा निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी वळता करण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे केली होती. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मागणीला प्रतिसाद देत कर्मचाºयांच्या २०२० मध्ये होणाऱ्या बदल्या रद्द केल्या आहे.