शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागपूरच्या युवकाचा ट्रकने चिरडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:38 IST

नागपूरहून मनसर येथील शिवगौरी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. आशिष अरुण जोगे (२५) रा.स्नेहनगर, नागपूर असे मृत युवकाचे नाव आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने त्याला चिरडले. त्याचा सार्थक नामक मित्र थोडक्यात बचावला. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर डुमरी परिसरातील चंपाश्रमाजवळ दुपारी ११.४५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देडूमरी शिवारात भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कन्हान) : नागपूरहून मनसर येथील शिवगौरी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकाचा अपघातीमृत्यू झाला. आशिष अरुण जोगे (२५) रा.स्नेहनगर, नागपूर असे मृत युवकाचे नाव आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने त्याला चिरडले. त्याचा सार्थक नामक मित्र थोडक्यात बचावला. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर डुमरी परिसरातील चंपाश्रमाजवळ दुपारी ११.४५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.मूळचा अमरावती जिल्ह्यातील टवलार (परतवाडा)चा रहिवासी असलेला आशिष मागील ६ वर्षांपासून नागपूर येथील नातेवाईक मिलिंद भांडे यांच्या घरी राहत होता. तो नागपुरातील एका न्यूज पोर्टलमध्ये काम करीत होता.शनिवारी सकाळी आशिष आणि त्याचा मित्र सार्थक कलोडे (२४) टीव्हीएस व्हिक्टर बाईक क्रमांक एम.एच. ३१- बी.के.४३०१ वरुन डबलसीट आणि आशिषचे काका शैलेश जोगे दुसऱ्या बाईकवर घरून शिवगौरी येथे जाण्यासाठी निघाले. डुमरी परिसर येथे चंपा आश्रमाजवळ आशिष एका बाईकला ओव्हरटेक करीत असताना बाईकचा मागचा भाग दुसºया बाईकला लागला. त्यामुळे वेगात असलेली आशिषची बाईक खाली वाकली. बाईक खाली वाकल्याने सार्थक गाडीवरून उतरला तर आशिष बाईकसह रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या १० चाकी ट्रक क्रमांक आर.जे. ११- जी.ए.४७०७ चे चाक आशिषच्या अंगावरून गेले. दरम्यान, ट्रक चालकाने घाबरुन आशिष ट्रकखाली असल्याचा अंदाज बांधत ट्रक मागे घेतला त्यामुळे ट्रकची चाके पुन्हा आशिषच्या अंगावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक चालक रोहतास कुमार सिंह (२६) रा.कछला, उत्तर प्रदेश याला पकडून बेदम चोप दिला. ट्रकचा क्लीनर घटनास्थळावरून पसार झाला. कन्हान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजीव हाके आपल्या सहकऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आशिषचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत ठाण्यात जमा केला आहे. सार्थक कलोडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध भांदविच्या कलम २७९, ३०४(ए), १८४ अन्वये गुन्हा दाखल केला.ओवाळणी अन् नवीन कपडेअत्यंत मनमिळावू आणि नम्र असलेला आशिष कुणी, कोणत्याही कामासाठी आवाज दिला तरी धावून जायचा. त्यामुळे येथील मूळ निवासी नसला तरी स्रेहनगरातील अनेकांच्या घरातील सदस्यासारखा होता. भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणीने शुक्रवारी सायंकाळी ओवाळले. त्यावेळी तिने घेतलेले नवीन कपडे घालूनच तो आज घरून निघाला. मेयो चौकातील कार्यालयात जाण्याऐवजी तो मनसरकडे गेला अन् नंतर त्याच्या अपघाती मृत्यूची वार्ताच नागपुरात आली. मृत्यूचे वृत्त स्रेहनगरात शोककळा पसरवणारे ठरले. त्याच्या अनेक मित्रांना जबर मानसिक धक्का बसला आहे. सायंकाळी त्याचा मृतदेह काही वेळेसाठी स्रेहनगरात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आला. यावेळी त्याच्या मित्रांनाच नव्हे तर आजूबाजूच्या महिलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले. सायंकाळी आशिषचा मृतदेह त्याच्या मूळ गावाकडे रवाना करण्यात आला.

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू