लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेंट्रल अॅव्हेन्यू मार्गावरील मेयो रुग्णालयाच्या चौकात मासळी बाजारात छेडखानी करीत असलेल्या एका युवकाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. मारहाणीत जखमी झालेल्या युवकाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेतील आरोपी युवक मासळी बाजारातील एका दारुच्या दुकानावर गेला. तेथून दारु घेऊन तो परतत होता. तेवढ्यात त्याने रस्त्यावरून जाणाºया तरुणीची छेड काढली. विरोध केला असता त्याने तरुणीशी वाद घातला. यावेळी मासळी बाजारात गर्दी होती. युवक छेड काढत असल्याचे पाहून नागरिक संतप्त झाले. त्यांनी युवकाला बेदम मारहाण केली. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी युवकाला रुग्णालयात पोहोचविले. गणेशपेठ ठाण्यांतर्गत तीन दिवसातील छेडखानीची ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी बाल्या माने याने एका युवतीची छेड काढून तिला मारहाण केली होती. दोन दिवसानंतर पोलीस बाल्याचा शोध घेऊ शकले नाहीत. मेयो चौकातील दारु दुकानामुळे महिलांसोबत छेडखानीच्या घटना घडत असून या दुकानामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. पोलिसांशी लागेबांधे असल्यामुळे या दुकानाविरुद्ध पोलीस कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.
नागपुरात छेडखानी करणाऱ्या तरुणाला बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:30 IST
सेंट्रल अॅव्हेन्यू मार्गावरील मेयो रुग्णालयाच्या चौकात मासळी बाजारात छेडखानी करीत असलेल्या एका युवकाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. मारहाणीत जखमी झालेल्या युवकाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपुरात छेडखानी करणाऱ्या तरुणाला बदडले
ठळक मुद्देमेयो रुग्णालय चौकातील घटना : आरोपी पोहोचला रुग्णालयात