नागपुरात अभियंता तरुणीने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 00:47 IST2021-04-03T00:44:54+5:302021-04-03T00:47:13+5:30
young lady engineer hanged herself टाटा कंपनीत अभियंता असलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली.

नागपुरात अभियंता तरुणीने लावला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - टाटा कंपनीत अभियंता असलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. रागिनी जिंबल वासनिक (वय २१) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वाठोड्याच्या पवनशक्तीनगरात राहणा-या रागिनीने बीईचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. ती टाटा कंपनीत दोन महिन्यांपूर्वीच लागली होती. ऑनलाइन जॉब करणाऱ्या रागिनीने शुक्रवारी दुपारी १ ते २ च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस सांगतात. दरम्यान, जिंबल बासिराम वासनिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.