नागपुरात पावणेतीन लाखांची गर्द जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:26 IST2018-04-20T22:26:01+5:302018-04-20T22:26:15+5:30
गर्दची खेप घेऊन नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील दोन अमली पदार्थ तस्करांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

नागपुरात पावणेतीन लाखांची गर्द जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गर्दची खेप घेऊन नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील दोन अमली पदार्थ तस्करांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. बालूसिंग गुमानसिंग सोंधिया (वय ३२) आणि शंकरलाल सत्यनारायण व्यास (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही मध्य प्रदेशातील पावटी, गरोठ, जि. मंदसौर येथील रहिवासी आहेत.
गर्दची खेप घेऊन दोन तस्कर नागपुरात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. शुक्रवारी दुपारी ४.४० च्या सुमारास ते ताज सैलानी ट्रस्ट समोरच्या मैदानात, महादुला टी पॉर्इंटजवळ आढळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता आरोपींकडे २ लाख, ६५ हजार किमतीची २६५ ग्राम गर्द, एक हजार रुपये, तीन मोबाईल असा एकूण २ लाख, ६७ हजार, ८०० रुपयांचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. त्यांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली.
रेल्वेने तस्करी
आरोपींकडे आढळलेल्या रेल्वे तिकिटावरून ते गर्दची तस्करी रेल्वेने करीत असल्याचे उघड झाले. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, हवालदार दत्ता बागुल, विठोबा काळे, तुलसी शुक्ला, नितीन रांगणे, किशोर महंत, नीता पाटील, नितीन साळुंखे, नरेश शिंगणे आदींनी ही कारवाई केली.