नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; शेतकऱ्यांना मदत कधी देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 18:34 IST2019-12-19T18:33:38+5:302019-12-19T18:34:22+5:30
या सरकारकडून शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणे चूक असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केला.

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; शेतकऱ्यांना मदत कधी देणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विधीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस होता. राज्यपालांच्या अभिभाषणावर सरकारकडून उत्तर आले. राज्यातील शेतकरी मागील चार दिवसांपासून अधिवेशनातून काहीतरी मिळेल या अपेक्षेने आस लावून बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची ग्वाही महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला नुसती पाने पुसली जात आहे. सरकारकडून केवळ राजकीय भाषण देणे सुरु आहे. याकरता सरकारचा धिक्कार करत आम्ही सभात्याग केला आहे. त्यामुळे या सरकारकडून शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणे चूक असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केला. विदर्भात अधिवेशन सुरू असताना विदर्भाच्या मुद्यावर चर्चा केली जाऊ देत नाही. विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न कसा सोडवला जाईल, प्रलंबित प्रकल्पांना गती कशी दिली जाईल यावर कुणी बोलत नाही. मराठा वॉटर ग्रीडचा प्रश्न असो राज्यातील ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था यावर सरकारकडून उत्तर दिले जात नाही. त्यामुळे या अधिवेशनातून राज्यातील जनतेला विशेषत: विदर्भातील जनतेला काही मिळेल असे वाटत नाही.