नागपूर : सासुरवाडीला गेले, चोरटाने रोख आणि दागिनेच चोरून नेले

By दयानंद पाईकराव | Updated: April 5, 2023 14:40 IST2023-04-05T14:40:14+5:302023-04-05T14:40:33+5:30

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.

Nagpur: Went to father-in-law's house, thief stole only cash and jewellery | नागपूर : सासुरवाडीला गेले, चोरटाने रोख आणि दागिनेच चोरून नेले

नागपूर : सासुरवाडीला गेले, चोरटाने रोख आणि दागिनेच चोरून नेले

नागपूर : घराला कुलूप लाऊन सासुरवाडीला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख ५ हजारासह १ लाख १७ हजार २०० रुपयांचे दागिने अज्ञात आरोपीने पळविले. ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ३ एप्रिलला सायंकाळी ५ ते मंगळवारी ४ एप्रिलच्या दुपारी २.४५ दरम्यान घडली.

नितेश सुरेश पुरी (वय ३३, निर्मल हाऊसिंग सोसायटी, गायत्रीनगर, गोरेवाडा) हे डाक विभागात कार्यरत आहेत. सोमवारी ते आपल्या घराला कुलुप लाऊन कळमेश्वर येथे सासुरवाडीला गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लोखंडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागीने व रोख ५ हजार असा एकुण १ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Nagpur: Went to father-in-law's house, thief stole only cash and jewellery