नागपूर विद्यापीठ : विधानसभा निवडणुकांसाठी परीक्षा 'पोस्टपोन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 09:28 PM2019-09-24T21:28:15+5:302019-09-24T21:29:31+5:30

निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे.

Nagpur University: Postpone Examination for Assembly Elections | नागपूर विद्यापीठ : विधानसभा निवडणुकांसाठी परीक्षा 'पोस्टपोन'

नागपूर विद्यापीठ : विधानसभा निवडणुकांसाठी परीक्षा 'पोस्टपोन'

Next
ठळक मुद्दे२१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलले

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले असून नवीन वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात आले आहे.
विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान केंद्र म्हणून साधारणत: निवडणूक आयोगाकडून शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्यात येतात. केवळ मतदानाचा दिवसच नाही तर त्याअगोदरचे २ दिवस व नंतरचा १ दिवसदेखील तेथे निवडणुकांचे काम सुरू असते. यात मतदानाची तयारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेची आखणी तसेच मतदानानंतरचे सोपस्कार यांचा समावेश असतो. दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना ३ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. १०० हून अधिक विषयांच्या परीक्षा नेमक्या २१ ऑक्टोबर रोजीच रोजीच आल्या आहेत. अद्याप निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्र नेमकी कुठली राहतील याची कुठलीही यादी आलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा विद्यापीठाने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सद्यस्थितीत २१ व २२ आॅक्टोबरचे सुमारे १५० पेपर ‘पोस्टपोन’ करण्यात आले आहेत.

नवीन वेळापत्रक लवकरच
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. निवडणुकांच्या वेळी परीक्षा केंद्रांवरील मतदान लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा जरी मतदानाच्या कालावधीत येत असल्या तरी निवडणुका होणेदेखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल. २० ऑक्टोबरला रविवारची सुटी आहे. यानंतर २१ ऑक्टोबर रोजी मतदान आहे. २२ तारखेलादेखील मतदान केंद्रांवर प्रशासकीय प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे दोन्ही दिवशीचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Nagpur University: Postpone Examination for Assembly Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.