शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

नागपूर विद्यापीठ : परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:37 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे.

ठळक मुद्दे‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे आव्हान : राज्य शासनाकडे प्रशासनाचे लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे. जर सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्याव्या लागल्या तर विद्यापीठाला परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. अशा स्थितीत महाविद्यालयांना यासाठी मनविणे हे विद्यापीठासमोरील मोठे आव्हान ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. राज्य शासनातर्फे मंगळवारी परीक्षा नकोच, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांबाबत शासन ठोस कोणता निर्णय घेते यावर विद्यापीठाच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.असे असले तरी जर परीक्षा झाली तर काय याबाबत आतापासूनच विचार करावा लागणार आहे. परीक्षांचे पेपर नव्याने ‘सेट’ करणे हे काम लवकर होईल. परंतु आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान हे परीक्षा केंद्रांंचे असेल अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे अनिवार्य असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्यादेखील त्या हिशेबाने वाढवावी लागेल. नागपूर विद्यापीठात ५०३ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील २५० हून महाविद्यालये तर ग्रामीण भागात आहेत. सर्वच ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळले तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. अशा स्थितीत नवीन परीक्षा केंद्रांचा शोध प्रशासनाला घ्यावा लागेल. ही तारेवरची कसरत ठरेल. परीक्षा केंद्र निश्चित करताना विद्यार्थ्यांना ते केंद्र येण्याजाण्यासाठी सोयीचे आहे का, तिथे इतर सुविधा आहेत का ही बाबदेखील पाहण्यात येते. त्यामुळे हे सर्व नियोजन करताना प्रशासनाची दमछाक होणार आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.महाविद्यालयांची भूमिकादेखील महत्त्वाचीजर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर महाविद्यालयाची भूमिकादेखील महत्त्वाची ठरेल. परीक्षा केंद्र स्थापन करण्यासाठी महाविद्यालये होकार देतील का हा प्रश्न आहे. शिवाय अनेक महाविद्यालयांत आवश्यक संख्येत प्राध्यापक नाहीत. अशा स्थितीत परीक्षा केंद्रांवरील नियोजन कसे राहील याचादेखील प्रशासनाला विचार करावा लागेल.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा