शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

'जेएनयू'वरुन नागपूर विद्यापीठ तापले : 'कॅम्पस'मध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 9:19 PM

‘जेएनयू’मध्ये प्राध्यापक व विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील उमटले.

ठळक मुद्दे‘अभाविप’ डाव्या पक्षांविरोधात आक्रमक, आंबेडकर विद्यार्थी संघटनेची सरकारविरोधात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जेएनयू’मध्ये प्राध्यापक व विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील उमटले. या मुद्द्यावरुन सकाळच्या सुमारास विद्यार्थी संघटनांनी अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे केंद्र शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने डाव्या पक्षांचेच हे षडयंत्र असल्याचा आरोप करत आंदोलन केले. दोन्ही विद्यार्थी संघटनांंचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी असल्याने तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने शांततामय पद्धतीने आंदोलन झाले. 

सकाळी नऊ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना तर साडेनऊ वाजता अभाविपतर्फे आंदोलन होणार होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘जेएनयू’मधील हल्लेखोरांवर कारवाई करावी या मागणीसाठी निदर्शने सुरू केली. परंतु काही वेळातच केंद्र शासनाविरोधात नारेबाजी सुरू झाली. सुमारे सव्वा तास त्यांची निदर्शने चालली. यावेळी शिलवंत मेश्राम यांच्यासह भूषण वाघमारे, प्रिती रामटेके, स्नेहल वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.यादरम्यान अभाविपचे कार्यकर्तेदेखील परिसरात गोळा झाले होते व अगोदरचे आंदोलन संपण्याची ते प्रतिक्षा करत होते. पाऊणे अकरा वाजताच्या सुमारास अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. डाव्या पक्षांकडून देशाचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यापीठांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडवून आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. यावेळी अभाविपचे नागपूर महानगर मंत्री अमित पटले, करिमा सिंग, वैभव बावनकर प्रामुख्याने उपस्थित होते. साडेअकराच्या सुमारास राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तदोन्ही विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाच्या वेळेत अर्ध्या तासाचेच अंतर होते. त्यामुळे अकारण तणाव उत्पन्न होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना सूचना दिली होती. पोलिसांचा ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वारावर सकाळपासूनच बंदोबस्त होता. दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकाच परिसरात जमा झाल्यानंतर तर दंगल प्रतिबंधक पथकदेखील तैनात करण्यात आले. प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनीदेखील सकाळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.आंदोलनाची परवानगीच नव्हतीविद्यार्थी संघटनांना ‘कॅम्पस’मध्ये आंदोलन करण्याची परवानगीच देण्यात आली नव्हती. तरीदेखील आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे प्रवेशद्वाराच्या बाहेर आंदोलन केले तर ताब्यात घ्यावे लागेल असे पोलिसांनी अगोदरच स्पष्ट केले होते. त्यामुळे दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आतच आंदोलन केले. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी ‘कॅम्पस’मध्ये जाणारे विद्यार्थी उत्सुकतेपोटी प्रवेशद्वाराजवळ थांबत होते. त्यामुळे मोठ्या प्रमामात आंदोलन सुरू आहे असे चित्र निर्माण झाले होते. परंतु प्रत्यक्षात ‘कॅम्पस’मधील जास्त विद्यार्थी या निदर्शनांमध्ये सहभागीच झाले नव्हते.

टॅग्स :jnu attackजेएनयूRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ