शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

नागपूर विद्यापीठ :आजपासून ‘पेट’चे दुहेरी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:45 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) बुधवारपासून सुरुवात होणार आहे. दोन हजारांहून अधिक परीक्षार्थी ‘पेट’ देणार असून, यात सहा ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे.

ठळक मुद्देदोन हजारांहून अधिक परीक्षार्थी, सहा ज्येष्ठ नागरिकदेखील देणार परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) बुधवारपासून सुरुवात होणार आहे. दोन हजारांहून अधिक परीक्षार्थी ‘पेट’ देणार असून, यात सहा ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. यंदापासून ‘पेट’च्या नकारात्मक गुणांचे आव्हान वाढले असून, दोन चुकीच्या उत्तरांसाठी एक गुण कापण्यात येणार आहे. त्यामुळे ‘पीएचडी’ नोंदणीसाठी इच्छुक असलेल्यांसमोरील आव्हानात वाढ झाली आहे.विद्यापीठाकडे ‘पेट’साठी ३ हजार ३८१ आॅनलाईन अर्ज सादर झाले होते. यापैकी २ हजार १८५ उमेदवार ‘आॅनलाईन’ परीक्षेसाठी पात्र ठरले. विद्यापीठाने आॅनलाईन परीक्षेसाठी एकूण सात ‘बॅच’ केल्या आहेत. सहा ‘बॅच’मध्ये एकाच वेळी प्रत्येक ३५० उमेदवार परीक्षा देतील तर सातव्या ‘बॅच’मध्ये ८१ परीक्षार्थी राहतील. ज्येष्ठ नागरिकांची मात्र ‘आॅफलाईन’ परीक्षा घेण्यात येणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार विद्यापीठानेही 'पेट'च्या नियमावलीत काही बदल केले आहेत. 'पेट' यंदा आॅनलाईन आणि लेखी अशा दोन स्तरावर होणार आहे. त्यानुसार दोन पेपर होतील. यात पहिला पेपर हा १०० गुणांचा असून 'अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट' पद्धतीचा असेल तर दुसरा पेपर हा विषयनिहाय आणि लेखी पद्धतीने घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेमध्ये स्वतंत्ररीत्या ५० टक्के घेऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. अनुसूचित जाती-जमातीसाठी ही मर्यादा ४५ गुणांची राहणार आहे. ‘पेट’ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’करिता नोंदणी करण्यासाठी तीन वर्षांची मर्यादा दिली आहे. या तीन वर्षांत नोंदणी न केल्यास त्याला पुन्हा 'पेट' द्यावी लागणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर