शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : यंदा महाविद्यालये शुल्कवाढ करू शकणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 22:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिकणाऱ्या व यंदाच्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये कुठल्याही प्रकारे शुल्कवाढ करू शकणार नाहीत. ‘कोरोना’मुळे अनेकांंना आर्थिक फटका बसला आहे. हीच बाब लक्षात घेता विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेच संबंधित प्रस्ताव संमत केला आहे.

ठळक मुद्देलाखो विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिकणाऱ्या व यंदाच्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये कुठल्याही प्रकारे शुल्कवाढ करू शकणार नाहीत. ‘कोरोना’मुळे अनेकांंना आर्थिक फटका बसला आहे. हीच बाब लक्षात घेता विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेच संबंधित प्रस्ताव संमत केला आहे.‘कोरोना’मुळे अनेक व्यवसाय अद्यापही बंद आहेत. खासगी क्षेत्राला मोठा फटका बसला असून, अनेकांच्या मिळकतीवरदेखील प्रचंड परिणाम झाला आहे. अशास्थितीत महाविद्यालयांनी यावर्षी कुठल्याही प्रकारे शुल्कवाढ करू नये, अशी विनंती करणारे पत्र ‘नुटा’तर्फे (नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन) मे महिन्यात विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले होते. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांनीदेखील प्रभारी कुलगुरूंकडे हा विषय लावून धरला होता. अद्यापपर्यंत प्रवेशाबाबत कुठलाही अंतिम निर्णय झाला नसला तरी महाविद्यालयांकडून शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता होती.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढ न करण्यासंदर्भात प्रशासनाकडूनच प्रस्ताव मांडण्यात आला. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ‘कोरोना’मुळे प्रचंड परिणाम झाला आहे. अशास्थितीत शुल्कवाढ झाली तर अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही, शिवाय शुल्कवाढीमुळे संपूर्ण कुटुंबावर ताण येईल. पालकांसमोर हे मोठे आव्हान होते. त्यामुळे शुल्कवाढ नकोच, असे या प्रस्तावात नमूद होते. व्यवस्थापन परिषद सदस्यांना या प्रस्तावाला समर्थन दिले. या शैक्षणिक सत्रात कुठल्याही महाविद्यालयाने शुल्कवाढ करण्यात येऊ नये, असा निर्णय यात घेण्यात आला.हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची सूटव्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार ठराविक मुदतीमध्ये एखादा विद्यार्थी शुल्क भरू शकला नाही तर त्याचा प्रवेश रद्द करता येणार नाही. संपूर्ण शुल्क एकत्रितपणे न भरता हप्त्यांमध्ये ते भरण्याची सूट महाविद्यालयांना द्यावी लागणार आहे. यासंदर्भात लवकरच प्रशासनाकडून परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी