शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur : 'ब्रह्मा'ला संपवणाऱ्या 'छोटा मटका'ची प्रकृती गंभीर; उच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:29 IST

Nagpur : न्यायालयाने स्वतःच जनहित याचिका केली दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील जखमी 'छोटा मटका' वाघाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून, वन विभागाचे त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष आहे. त्याला आता चालणेही कठीण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने ही बाब गंभीरतेने घेऊन याविषयी स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे.

ताडोबाच्या बफर क्षेत्रात साम्राज्य निर्माण केलेल्या छोटा मटकाची गेल्या बुद्धपौर्णिमेच्या दिवशी 'ब्रह्मा' वाघासोबत लढाई झाली. त्यात ब्रह्मा ठार तर, छोटा मटका गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला मोठ्या चिरा पडल्या आणि त्यात सातत्याने रक्त येत होते. परंतु, वन विभागाने त्याच्यावर तातडीने प्रभावी उपचार केले नाही. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

मटकासूर व छोटी ताराचा पुत्रछोटा मटका हा मटकासूर व छोटी तारा यांचा पुत्र आहे. त्याचा जन्म २०१६ मध्ये झाला. त्याचा भाऊ ताराचंद वीज पडल्यामुळे मरण पावला. छोटा मटकाला छोटी ताराने वाढवून अत्यंत धाडसी बनवले. दरम्यान, मायाला आव्हान दिल्यामुळे मटकासूरने त्याला बाहेर हाकलले होते. त्यानंतर तो २०१८ मध्ये बफर झोनमध्ये परत आला आणि निमढेला, अलिझंझा व नवेगाव परिसरात वर्चस्व प्रस्थापित केले.

अॅड. यश सांबरे न्यायालय मित्रया प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व अजित कडेठाणकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अॅड. यश सांबरे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्त्ती केली. तसेच, त्यांना एक आठवड्यात नियमानुसार जनहित याचिका तयार करण्यास सांगितले.

मोगली, बजरंग, ब्रह्मासोबत लढलाछोटा मटका आतापर्यंत मोगली, बजरंग व ब्रह्मासोबत लढला आणि जिंकला. त्याने सुरुवातीला २०२१ मध्ये वयाने मोठा असलेल्या मोगलीला जमीन दाखवली. त्यानंतर २०२३ मध्ये तेव्हापर्यंत अपराजीत असलेल्या बजरंगला यमसदनी धाडले तर, २०२५ मध्ये ब्रह्माला पराभूत केले. मात्र, या लढाईत छोटा मटका स्वतः ही गंभीर जखमी झाला.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पforest departmentवनविभागHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर