Nagpur | कंटेनरच्या धडकेत एसटी बस पलटी, एक जखमी
By दयानंद पाईकराव | Updated: August 31, 2022 11:47 IST2022-08-31T11:44:28+5:302022-08-31T11:47:04+5:30
काटोल नाक्याजवळील घटना

Nagpur | कंटेनरच्या धडकेत एसटी बस पलटी, एक जखमी
नागपूर : कंटेनरने धडक दिल्यामुळे एसटी बस पलटून बसमधील एक मुलगी जखमी झाली. ही घटना नवीन काटोल नाक्याजवळ बुधवारी सकाळी सात वाजता घडली.
बुधवारी सकाळी सात वाजता घाट रोड आगाराची बस क्रमांक एम. एच. ४०, एन. ८४७२ ही बस कळमेश्वर येथून नागपूरकडे येत होती. नवीन काटोल नाक्याजवळ सकाळी सात वाजता कंटेनर क्रमांक एन. एल. ०१, ए. डी. ९७७२ ने बसला चालकाच्या बाजूने मागून जोरदार धडक दिल्यामुळे बस पलटली.
बसमध्ये एकूण ९ प्रवासी होते. यातील योगिता धकाते ही मुलगी किरकोळ जखमी झाली. तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसला धडक दिल्यानंतर कंटेनरने ट्रक क्रमांक एम एच ४०, डी. एल. ०१३६ ला धडक दिली. घटनेची माहिती मिळताच घाट रोड आगाराचे व्यवस्थापक कुलदीप रंगारी, वाहतूक निरीक्षक रोहित कछवा घटनास्थळी पोहोचले.