नागपुरात  आजारी तरुणीने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 21:20 IST2020-11-05T21:17:55+5:302020-11-05T21:20:04+5:30

Sick young woman strangled herself, Nagpur news चार ते पाच दिवसांपासून आजारी असलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. सोनाली नरेश कुरिल (वय २४) असे मृत तरुणीचे नाव असून ती एमआयडीसीतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) वसाहतीत राहत होती.

In Nagpur, a sick young woman strangled herself | नागपुरात  आजारी तरुणीने लावला गळफास

नागपुरात  आजारी तरुणीने लावला गळफास

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर - चार ते पाच दिवसांपासून आजारी असलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. सोनाली नरेश कुरिल (वय २४) असे मृत तरुणीचे नाव असून ती एमआयडीसीतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) वसाहतीत राहत होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनालीचे वडील एसआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. चार दिवसापासून तिचा आजार सारखा वाढतच चालला होता. खाणेपिणेही बंद झाले होते. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच सोनालीने बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. कोविडच्या धाकामुळे सोनालीने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी त्याचा इन्कार केला असून, सोनालीच्या आत्महत्येमागचे कारण शोधले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: In Nagpur, a sick young woman strangled herself