नागपूर परत हादरले, पतीने अगोदर पत्नीचा केला खून मग केली आत्महत्या
By योगेश पांडे | Updated: July 2, 2023 15:47 IST2023-07-02T15:47:21+5:302023-07-02T15:47:51+5:30
सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मॉईल वसाहतीत ही थरारक घटना घडली.

नागपूर परत हादरले, पतीने अगोदर पत्नीचा केला खून मग केली आत्महत्या
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच असून रविवारी एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेत स्वतः आत्महत्या केली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मॉईल वसाहतीत ही थरारक घटना घडली असून पत्नी मॉइलमध्ये कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोनिया मंडाले (४०)असे मृतक पत्नीचे नाव असून राजेश (४५) हा आरोपी पती आहे.सोनिया मॉईलमध्ये कार्यरत होती तर राजेश गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला आणि राजेशने सोनियाच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांची तेरा वर्षीय मुलगी त्यावेळी घरातच होती. तिने तातडीने नातेवाईक व शेजारच्यांना या प्रकाराची माहिती दिली. सदर पोलीस ठाण्याचे पथक देखील घटनास्थळावर पोहोचले. पती-पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.या प्रकारामुळे मॉईल वसाहतीत खळबळ उडाली आहे.