शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

खारबी चौकातील अपघाताने नागपूर हादरलं ! भरधाव बसच्या धडकेत ट्यूशनहून परतणाऱ्या भाग्यश्रीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:42 IST

Nagpur : भाग्यश्री सकाळी ट्यूशनवरून परतत असताना ही दुःखद घटना घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बसने दुचाकीला धडक दिल्याचा प्रसंग कैद झाला आहे.

नागपूर : नागपूरमधील खारबी चौकाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. १७ वर्षांची भाग्यश्री जियालाल टेंभरे ही दुचाकीवरून जात असताना एका खाजगी बसने तिच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ती जागीच गंभीर जखमी झाली आणि रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला.

भाग्यश्री सकाळी ट्यूशनवरून परतत असताना ही दुःखद घटना घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बसने दुचाकीला धडक दिल्याचा प्रसंग कैद झाला आहे. अपघातानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरु आहे.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातामागील कारणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवला असून बसचालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनकडे नागरिकांनी जलद पावले उचलण्याची मागणी केली आहे. याशिवाय रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवणे, चेतावणी फलक लावणे आणि वाहनचालकांवर कडक नियंत्रण ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur shaken by accident: Girl killed by speeding bus.

Web Summary : A 17-year-old girl died in Nagpur after a speeding bus hit her scooter while returning from tuition. The accident, captured on CCTV, sparked outrage. Police seized the bus and are investigating, prompting calls for stricter traffic enforcement.
टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात