Nagpur: "मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच", भाजप आमदार परिणय फुके यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 22:05 IST2024-07-22T22:05:07+5:302024-07-22T22:05:36+5:30
Nagpur News: मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात आहे. हे सर्व षडयंत्र शरद पवार यांनीच रचले आहे. जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, तसेच शरद पवार यांनाही आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप भाजपचे आ. डॉ. परिणय फुके यांनी केला.

Nagpur: "मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच", भाजप आमदार परिणय फुके यांचा आरोप
नागपूर - मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात आहे. हे सर्व षडयंत्र शरद पवार यांनीच रचले आहे. जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, तसेच शरद पवार यांनाही आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप भाजपचे आ. डॉ. परिणय फुके यांनी केला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना आ. फुके म्हणाले, शरद पवार यांना फक्त ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडण लावायचे आहे. आता सामान्य माणसाला हे स्पष्ट झाले आहे की, जरांगे कुणाची सुपारी वाजवत आहेत. ज्यांच्याकडून काही भेटत आहे, त्यांच्यावर जरांगे हे आरोप करणारच नाही. जरांगे यांच्या सर्व भूमिका संशयास्पद आहेत. मराठा समाजाला संवैधानिक आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यानंतरही जरांगे हे शरद पवार यांच्या इशाऱ्यावर दोन समाजांत वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही फुके यांनी केला.