अजनीवरून धावणार नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:09 PM2018-05-28T23:09:01+5:302018-05-28T23:09:16+5:30

नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर वॉशेबल अ‍ॅप्रानच्या देखभालीसाठी ३० मे ते ३ जुलै दरम्यान काही रेल्वेगाड्यांच्या परिचालनात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत ८ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना नागपूरऐवजी अजनी आणि इतवारी रेल्वेस्थानकावर समाप्त करून तेथूनच सोडण्यात येणार आहे.

Nagpur-Secunderabad Express run from Ajni | अजनीवरून धावणार नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस

अजनीवरून धावणार नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचा निर्णय : शिवनाथ, इंटरसिटी इतवारीतच थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर वॉशेबल अ‍ॅप्रानच्या देखभालीसाठी ३० मे ते ३ जुलै दरम्यान काही रेल्वेगाड्यांच्या परिचालनात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत ८ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना नागपूरऐवजी अजनी आणि इतवारी रेल्वेस्थानकावर समाप्त करून तेथूनच सोडण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक १२७७२ नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस ३१ मे ते ३ जुलै दरम्यान अजनीवरून सोडण्यात येणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक १२७७१ सिकंदराबाद-नागपूर एक्स्प्रेस २ जुलैपर्यंत अजनीला समाप्त करण्यात येईल. रेल्वेगाडी क्रमांक ११४०२ नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ३० मे ते ३ जुलैपर्यंत आणि ११४०१ मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस २ जुलैपर्यंत अजनीला समाप्त होऊन तेथूनच सोडण्यात येईल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
.............
शिवनाथ, इंटरसिटी इतवारीला थांबेल
रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक १८२३९ गेवरा रोड-बिलासपूर-नागपूर शिवनाथ एक्स्प्रेस आणि १८२४० नागपूर-बिलासपूर शिवनाथ एक्स्प्रेस ३० मे ते ३ जुलैपर्यंत इतवारीवरून चालविण्यात येणार असून तेथेच समाप्त करण्यात येईल. या दिवशी रेल्वेगाडी क्रमांक १८२४० इतवारीवरून रात्री ११.५५ वाजता सुटेल. तसेच रेल्वेगाडी क्रमांक १२८५५ बिलासपूर-नागपूर इंटरसिटी आणि १२८५६ नागपूर-बिलासपूर इंटरसिटी ३० मे ते ३ जुलैपर्यंत इतवारीवरून चालविण्यात येईल. या दिवशी रेल्वेगाडी क्रमांक १२८५६ इतवारीवरून सकाळी ६.४० वाजता सुटेल.
.............

Web Title: Nagpur-Secunderabad Express run from Ajni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.