नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 01:26 IST2020-08-27T01:25:11+5:302020-08-27T01:26:24+5:30
कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन येत्या २ सप्टेंबरपर्यंत नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कार्यालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. कार्यालयात नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.

नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन येत्या २ सप्टेंबरपर्यंत नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कार्यालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. कार्यालयात नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.
यासंदर्भात पोलीस माहिती कक्षातर्फे पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पोलीस अधीक्षक कार्यालयात, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कामासंदर्भात कार्यालयात न येता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपली समस्या सांगावी. यासाठी हेल्पलाइन नंबर १०० किंवा टेलिफोन नंबर ०७१२- २५६०२००, २५६०७७९ यावर संपर्क साधावा.