नागपूरकरांना उष्ण लाटेच्या झळा, पारा ४४ च्यावर

By निशांत वानखेडे | Updated: June 9, 2025 18:55 IST2025-06-09T18:54:02+5:302025-06-09T18:55:09+5:30

दीड महिन्यानंतर पुन्हा भाजले लाेक : बहुतेक जिल्ह्यात वाढले तापमान

Nagpur residents face heat wave, mercury above 44 | नागपूरकरांना उष्ण लाटेच्या झळा, पारा ४४ च्यावर

Nagpur residents face heat wave, mercury above 44

नागपूर : राजस्थान, पंजाब ते मध्य प्रदेशपर्यंत उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली असताना नागपूरकरांनाही उष्ण लाटांच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. २४ तासात तापमानात १.२ अंशाची वाढ हाेत ते थेट ४४.२ अंशावर उसळले आहे. एप्रिल महिन्यात काही दिवस पारा ४४ च्यावर गेला हाेता, जे राज्यात सर्वाधिक हाेते. त्यानंतर संपूर्ण मे महिना गारवा दिल्यानंतर जून महिन्यात सूर्य पुन्हा आब ओकायला लागला आहे.

हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात वादळ, विजा व मेघगर्जनेसह किरकाेळ पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. साेमवारी सकाळी आकाशात ढगांची उपस्थिती नगण्य हाेती. त्यामुळे सूर्याचा ताप अधिक तीव्रपणे जाणवला. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली पण सावलीपेक्षा उन्हाच्या झळा त्रासदायक ठरल्या हाेत्या. ढगांच्या उपस्थितीत दमट वातावरणामुळे उष्णतेचा प्रकाेप अधिकच वाढला हाेता. सायंकाळच्या दरम्यान शहरात काही ठिकाणी साेसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे थाेडा गारवा जाणवला. पण नागपूरकरांना आणखी काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागेल, अशी शक्यता आहे.

विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दाेन दिवसापासून तापमान वधारले आहे. वर्धा ४३.५ व ब्रम्हपुरी ४३.२ अंशावर पारा गेला. गाेंदिया, भंडारा व अमरावती ४२ अंशाच्यावर, तर चंद्रपूर, अकाेला, यवतमाळात पारा ४१ अंशावर गेला आहे. मे महिन्यात शांत राहिलेला सूर्य जूनमध्ये आग ओकायला लागला आहे. हवामान विभागाने पुढचे चार दिवस मेघगर्जना, वादळ व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा वळव्याचा पाऊस असेल.

दरम्यान आठ-दहा दिवसांपासून खाेळंबलेला मान्सून विदर्भात व उर्वरित महाराष्ट्रात १३ जूनपासून पुन्हा सक्रिय हाेईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. विदर्भाचे गडचिराेली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात त्याची सक्रियता अधिक असेल. नागपूरकरांना मात्र चांगल्या पावसाची वाट पहावी लागेल.

Web Title: Nagpur residents face heat wave, mercury above 44

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.