स्वच्छतेत नागपूर रेल्वे स्थानक तिसरे; बैतूल पहिल्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 10:42 AM2019-10-03T10:42:51+5:302019-10-03T10:43:14+5:30

भारतीय रेल्वेत करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेतील ए-१ क्लास नागपूर रेल्वे स्थानकाला एनएसजी-२ कॅटेगिरीत तिसरे स्थान मिळाले आहे.

Nagpur Railway Station third in cleanliness | स्वच्छतेत नागपूर रेल्वे स्थानक तिसरे; बैतूल पहिल्या क्रमांकावर

स्वच्छतेत नागपूर रेल्वे स्थानक तिसरे; बैतूल पहिल्या क्रमांकावर

Next
ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय रेल्वेत करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेतील ए-१ क्लास नागपूर रेल्वे स्थानकाला एनएसजी-२ कॅटेगिरीत तिसरे स्थान मिळाले आहे.
बैतूल रेल्वे स्थानकाला एनएसजी ४ कॅटेगिरीत प्रथम, चंद्रपूरला तृतीय क्रमांक मिळाला आहे. एनएसजी ३ प्रवर्गात वर्धा रेल्वे स्थानकाचा दुसरा आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकाला पाचवा क्रमांक मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणानुसार थेट निरीक्षणासाठी ३५ गुण, मूल्यांकनासाठी ३५ गुण आणि ग्राहकांच्या फीडबॅकसाठी ३५ गुण ठेवण्यात आले होते. यापूर्वी २०१८ मध्ये भारतीय रेल्वेच्या ४०७ रेल्वे स्थानकावर सर्वेक्षण करण्यात आले होते. यात ए १ प्रवर्गात ७५ रेल्वे स्थानकांचा समावेश होता. यात नागपूर रेल्वे स्थानक ३३ व्या क्रमांकावर होते. या वर्षी २०१९ मध्ये ७२० रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ए १ प्रवर्गात (एनएसजी-२) ७७ स्थानकांपैकी नागपूर रेल्वे स्थानकाला ३७ वी रँक आणि एनएसजी-२ प्रवर्गात तिसरा क्रमांक मिळला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर विविध विकास कामे सुरू आहेत. यामुळे जागोजागी तोडफोड सुरू आहे. या कारणामुळे निरीक्षण प्रवर्गात नागपूर रेल्वे स्थानकाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. मूल्यांकन आणि कस्टमर फीडबॅकमध्ये चांगले गुण मिळाल्याची माहिती आहे. रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेच्या तपासणीसाठी केलेल्या सर्वेक्षणात भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. झोनच्या नागपूर विभागांतर्गत राजनांदगाव स्टेशन १३ व्या, भंडारा रोड स्टेशन १०१ आणि कामठी स्टेशनला १४१ वी रँक मिळाली आहे.

Web Title: Nagpur Railway Station third in cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.