शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नागपूर रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासांची कामे जोरात, अनेक कामे पूर्ण, अनेक प्रगतीपथावर

By नरेश डोंगरे | Published: December 02, 2023 4:34 PM

प्रवाशांना अत्याधुनिक सेवा, सुविधा या कामातून मिळणार आहेत. शिवाय रेल्वे स्थानकाचे साैंदर्यही खुलणार आहे.

नागपूर : येथील रेल्वे स्थानकावरील पुनर्विकासाच्या कामांची गाडी चांगलीच गतीमान झाली आहे. एकूण ४८७.८८ कोटींची ही कामे असून त्यातील बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामे ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत.

रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कामांपैकी वेस्ट साइड केबल शिफ्टिंग, माती तपासणी, साइट लॅब चालू करणे, बॅचिंग प्लांटची बांधणी, पूर्व बाजूची युटिलिटी शिफ्टिंग, वाहतूक वळवण्यासाठी नवीन प्रवेश / निर्गमन, पार्किंग क्षेत्र बदलणे आणि व्हील वॉशिंग युनिटची उभारणी ईत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. तर, तळघरातील स्लॅबचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पूर्ण केले जात आहे. त्याचप्रमाणे ग्राउंड लेव्हल स्लॅब शटरिंगचे काम आणि उत्खनन तसेच पाया भरणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी कळविले आहे.विशेष म्हणजे, नागपूर येथील मुख्य रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश असून, त्यानुसार या स्थानकाच्या आत आणि बाहेर विविध विकास कामे करून रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलवण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा, सुविधा या कामातून मिळणार आहेत. शिवाय रेल्वे स्थानकाचे साैंदर्यही खुलणार आहे.

'वर्ल्ड क्लास स्टेशन'

दुसरे म्हणजे, अजनी रेल्वे स्थानकाचा विकास आणि साैंदर्यीकरणाचे कामही जोरात सुरू आहे. अजनी रेल्वे स्थानकाला 'वर्ल्ड क्लास स्टेशन' बनविण्याचे आधीच जाहिर झाले असून त्या संबंधाने आकर्षक डिझाईनही तयार झाले आहे. त्यानुसार, विविध कामे वेगाने केली जात आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहरात अजनी रेल्वे स्थानकाच्या रुपाने एका आकर्षक वास्तूची भर पडणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर