शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

नागपूर रेल्वेस्थानकावर २.४५ लाखाचा गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 9:52 PM

रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलोग्रॅम वजनाचा २.४५ लाखाचा गांजा असलेल्या दोन ट्रॉलीबॅग पकडल्या. जप्त केलेला गांजा कागदोपत्री कारवाईनंतर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

ठळक मुद्देदक्षिण एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २४.५ किलोग्रॅम वजनाचा २.४५ लाखाचा गांजा असलेल्या दोन ट्रॉलीबॅग पकडल्या. जप्त केलेला गांजा कागदोपत्री कारवाईनंतर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा हा बुधवारी सकाळी ९.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होता. यावेळी समोरील जनरल कोचमध्ये काळ्या आणि निळ्या रंगाच्या दोन ट्रॉलीबॅग बेवारस स्थितीत आढळल्या. बॅगबाबत विचारणा केली असता त्यावर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. दोन्ही ट्रॉली बॅग गाडी खाली उतरवून त्याची सूचना उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांना देण्यात आली. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान रेक्सने दोन्ही बॅगची तपासणी करून त्यात मादक पदार्थ असल्याचा संकेत दिला. बॅग उघडून पाहिल्या असता त्यात १२ पाकिटात २४.५ किलो वजनाचा २.४५ लाखाचा गांजा असल्याचे आढळले. गांजाचा वास येऊ नये यासाठी त्यात नॅपथेलिन नावाच्या गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. कागदोपत्री कारवाई केल्यानंतर पकडलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरDrugsअमली पदार्थ