शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

नागपुरात  कुख्यात मेश्रामच्या मटका अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:11 AM

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने रामबागमधील कुख्यात लंकेश मेश्राम याच्या मटका अड्ड्यावर आज मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी सहा जणांना अटक करून रोख, मोटरसायकली, मोबाईलसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देसहा जुगारी सापडले : सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने रामबागमधील कुख्यात लंकेश मेश्राम याच्या मटका अड्ड्यावर आज मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी सहा जणांना अटक करून रोख, मोटरसायकली, मोबाईलसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.कुख्यात मेश्राम गेल्या अनेक वर्षांपासून पेशुमल धर्मशाळेजवळ मटक्याचा अड्डा चालवून रोज हजारोंची लगवाडी, खायवाडी करतो. ही माहिती कळताच उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इमामवाड्याचे ठाणेदार एम. एम. साळुंके तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी या मटका अड्ड्यावर छापा मारला. विशेष म्हणजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंके यांनी इमामवाड्याचे ठाणेदार म्हणून आजच पदभार सांभाळला आणि रात्री ८ वाजता छापा मारला. तेथे पोलिसांना आरोपी निशांत दिनेश शंभरकर (वय ३९, रा. रामबाग), प्रदीप रामचंद्र उमरे (वय ५०, रा. चंद्रमणीनगर), राजा धनराज मांजरे (वय ४०, रा. राजाबाक्षा वसाहतीजवळ), सतीश गुरुदेव गाणार (वय ४२, रा. उंटखाना), पृथ्वीराज एकनाथ तागडे (वय ५४, रा. अजनी) आणि राजेश राजू गुप्ता (वय ५४, नंदनवन) हे जुगारी सापडले. तर, मटका अड्डा चालविणारा लंकेश मेश्राम (वय ६०, रा. रामबाग) पळून गेला. उपरोक्त आरोपींविरुद्ध पोलिसांनी जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १४,१२० रुपये, दोन मोटरसायकली, पाच मोबाईलसह १ लाख, १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.वारंवार कारवाई, अड्डा मात्र सुरूचछापा पडणार अशी कुणकुण लागताच मुुख्य आरोपी मेश्राम फरार झाला. विशेष म्हणजे, पोलिसांनी मेश्रामच्या अड्ड्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई केली असून, त्याच्याविरुद्ध हद्दपारीचीही कारवाई केली. मात्र, त्याच्यावर परिणाम झालेला नाही. फरार मेश्रामचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाड