शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

भाजी रस्त्यावर फेकणार्‍या पीएसआयची चौकशी; सोशल मीडियावर 'लोकमत'चे वृत्त आणि व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 21:15 IST

रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्तः फेकून देणाऱ्या जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांची चौकशी सुरू झाली आहे.

नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्तः फेकून देणाऱ्या जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यांना पोलीस आयुक्तलयातून आज 'शोकॉज नोटीस'ही बजावण्यात आली आहे. दरम्यान, 'लोकमत'मध्ये उमटलेल्या वृत्तामुळे या घटनेचा चोहोबाजूंनी निषेध केला जात आहे. शहर पोलीस दलानेही त्यांच्या ट्विटरवर संबंधित अधिकार्‍याचे वर्तन अशोभनीय असून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

पोलीस उपनिरीक्षकानं महिला दुकानदाराची भाजी रस्त्यावर फेकली, Video व्हायरल; चौकशीचे आदेश 

कोरोनामुळे सर्वत्र दहशत पसरली आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी रोजच्या जगण्या-मरण्याची लढाई लढणारे छोटे छोटे दुकानदार रस्त्यावर दुकाने लावतात. त्यामुळे तेथे ग्राहक झुंबड करतात आणि कोरोना प्रादुर्भावाचा धोका अधिक वाढतो.  जरीपटक्यात मंगळवारी आठवडी बाजारात अशाच प्रकारे एका महिलेने रस्त्यावर भाजीचे दुकान लावले होते. तेथे ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहून जरीपटका पोलीस पथकाने तिला दोन वेळा दुकान गुंडाळण्यास सांगितले. मात्र मर्यादित वेळ संपूनही महिलेने दुकान सुरू ठेवल्याने गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी तिच्या दुकानातील भाजी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली. या घटनेचा व्हिडीओ गुरुवारी सायंकाळी व्हायरल झाला. लोकमतने त्यासंबंधीचे वृत्त आज प्रकाशित केले. त्यामुळे चोहोबाजूने निषेधाचा सूर उमटला. ट्विटर, व्हाट्सअपसह सोशल मीडियावर लोकमतच्या वृत्ताचे कात्रण आणि तो व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. या घटनेचा चोहोबाजूने निषेध नोंदविण्यात आला. त्याची दखल घेत  पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश दिले.  त्यानुसार खांडेकर यांना शो काज नोटीस बजावण्यात आली. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटर वरही या घटनेच्या संबंधाने खुलासा करण्यात आला. "ही घटना निंदनीय असून संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन अशोभनीय असल्याचे त्यात म्हटले आहे."उपायुक्तांकडून चौकशी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केले असून उपनिरीक्षक खांडेकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी