पोलीस उपनिरीक्षकानं महिला दुकानदाराची भाजी रस्त्यावर फेकली, Video व्हायरल; चौकशीचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 11:23 PM2021-05-20T23:23:52+5:302021-05-20T23:26:40+5:30

रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठांनी गुरुवारी जारी केले आहे.

Police sub inspector throws vegetables from a woman shopkeepers shop on the street Video goes viral | पोलीस उपनिरीक्षकानं महिला दुकानदाराची भाजी रस्त्यावर फेकली, Video व्हायरल; चौकशीचे आदेश 

पोलीस उपनिरीक्षकानं महिला दुकानदाराची भाजी रस्त्यावर फेकली, Video व्हायरल; चौकशीचे आदेश 

googlenewsNext

नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी एका पोलीस उपनिरीक्षकाने रस्त्यावर फेकून दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठांनी गुरुवारी जारी केले आहे. कोरोना संसर्गामुळे रस्त्यावर दुकाने लावू नका, गर्दी करू नका, असे महापालिका आणि पोलीस प्रशासन वारंवार सांगत आहे. कारवाईचे इशारेही दिले जात आहे. मात्र रोजच्या जगण्या मारण्याची लढाई लढणारे छोटे छोटे दुकानदार रस्त्यावर दुकाने लावतात. त्यामुळे तेथे ग्राहक झुंबड करतात आणि कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढतो.  

जरीपटक्यात अशाच प्रकारे एक महिला रस्त्यावर भाजीचे दुकान लावत होती. मंगळवारी सकाळी तेथे ग्राहकांची झुंबड उडाली. ते पाहून जरीपटका पोलीस पथकाने तिला बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान दोन वेळा दुकान गुंडाळण्यास सांगितले. मात्र मर्यादित वेळ संपूनही महिलेने दुकान सुरू ठेवल्याने गस्तीवर आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने तिच्या दुकानातील भाजी अक्षरशः फेकून दिली.  या घटनेचा व्हिडीओ गुरुवारी सायंकाळी व्हायरल झाला. त्याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश दिले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी या माहितीला दुजोरा दिला असून संबंधित पोलीस उपनिरीक्षक मंगळवारी रात्रभर रात्रपाळी आटोपून परत जात असताना ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Police sub inspector throws vegetables from a woman shopkeepers shop on the street Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर