शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'त्या' महिलेच्या हत्येचा उलगडा; ओळखीमुळे झाला घात, मैत्रीण व तिच्या पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 14:45 IST

नागपुरात स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. यानंतर हातपाय बांधून प्लॅस्टिकच्या मोठ्या पन्नीत तिचा मृतदेह गुंडाळून निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आला.

ठळक मुद्देनागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनाशनिवारी दुपारपासून होती बेपत्तागळा घोटला, हातपाय बांधून मृतदेह पोत्यात भरला आणि निर्जनस्थळी फेकून दिला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूरस्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेची अज्ञात आरोपीने हत्या केली. हातपाय बांधून प्लॅस्टिकच्या मोठ्या पन्नीत तिचा मृतदेह गुंडाळून निर्जन ठिकाणी फेकून दिला. रविवारी सकाळी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. तेव्हापासून परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. अखेर या घटनेची उकल झाली आहे.

स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या दीपा जुगल दास (४१) नामक महिलेच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला. बचत गटाच्या पैशाच्या व्यवहारामुळे दीपाची मैत्रीण आणि तिच्या पतीने हत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणात सुवर्णा तसेच तिचा पती सामी सोनी या दोघांना अटक केली.

समर्थनगरात राहणारी दीपा जुगल दास (४१) जैन स्कूलच्या बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत होती. तिला एक मुलगा आणि मुलगी असून तिचा पती स्टील कंपनीत काम करतो. दीपा बचत गटाचेही काम करून आर्थिक व्यवहाराचा हिशेबही सांभाळायची. दीपा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी कर्तव्यावर गेली. दुपारी २ च्या सुमारास तिला बसचालकाने कुशीनगरात उतरवून दिले. तेथून ती सुवर्णाच्या घरी गेली. नंतर बेपत्ता झाली.

रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास कपिलनगरातील एसडीपीएल सोसायटी, उप्पलवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर दीपाचा मृतदेह फ्रीजच्या प्लास्टीकमध्ये गुंडाळून असल्याचे दिसले. ही माहिती कळताच कपिलनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी

तपासाची चक्रे फिरवली. लास्ट लोकेशनच्या आधारे सुवर्णाला ताब्यात घेण्यात आले. रात्रीपर्यंत वेगवेगळी माहिती देणारी सुवर्णा अखेर गडबडली अन् तिने पतीच्या मदतीने दीपाची गळा आवळून हत्या केल्याचे कबुल केले.

एक लाखाचा होता व्यवहार

सूत्रांनुसार, दीपाने सुवर्णाला एक लाख रुपये बचत गटातून कर्जाच्या रुपात दिले होते. ते परत करण्यासाठी सुवर्णा अन् तिचा पती टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यावरून त्यांच्यात खटकेही उडत होते. शनिवारी दुपारी तसेच झाले. पैसे मागण्यासाठी आलेल्या दीपासोबत सुवर्णा आणि तिच्या पतीने वाद सुरू केला. पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमीका दीपाने घेतल्याने त्यांच्यात बाचाबाची आणि नंतर हाणामारी झाली. दीपा आरडाओरड करीत असल्याने सुवर्णा अन् तिच्या पतीने रागाच्या भरात तिच्या गळ्याभोवती ओढणीचा गळफास ओढला अन् तिला ठार मारले. नंतर रात्रीच्या वेळी प्लास्टीकमध्ये तो गुंडाळला. नंतर फ्रीजच्या खरड्याच्या बॉक्समध्ये मृतदेह भरून तो ई रिषात भरून उप्पलवाडीत नेऊन फेकला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूरPoliceपोलिस