नागपूर पोलीस म्हणतात, ‘बहुत कुछ होता है’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:15 IST2020-05-28T21:14:35+5:302020-05-28T21:15:17+5:30
कोविड १९ च्या संकटात घरातून बाहेर पडताना मास्क वापरण्यावर भर देण्यासाठी नागपूर पोलिसांनी १९९८ मधील शाहरुख खानने भूमिका केलेल्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील एका दृश्याचा वापर करून मिम पोस्ट केले आहे. त्यास सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

नागपूर पोलीस म्हणतात, ‘बहुत कुछ होता है’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड १९ च्या संकटात घरातून बाहेर पडताना मास्क वापरण्यावर भर देण्यासाठी नागपूर पोलिसांनी १९९८ मधील शाहरुख खानने भूमिका केलेल्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील एका दृश्याचा वापर करून मिम पोस्ट केले आहे. त्यास सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. युजर्सना नागपूर पोलिसांचे हे हृदयस्पर्शी आवाहन खूप आवडले आहे.
टिष्ट्वटरवर पोस्ट केलेल्या मिममध्ये नागपूर पोलिसांनी शाहरुख खानच्या चित्रपटातील एका दृश्याचा वापर केला आहे. त्यात शाहरुख खानने काजोलला मिठीत घेऊन सोबतच राणी मुखर्जीचा हात पकडून ठेवला आहे. पोलिसांनी या मिममध्ये शाहरुख खानला ‘यू’ (तुम्ही), काजोलला ‘गोर्इंग आऊट’ (बाहेर जाणे) आणि राणी मुखर्जीला ‘मास्क’चे नाव देऊन तुम्ही बाहेर जाताना मास्क वापरणे विसरू नका हा संदेश दिला आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईटवर या मिमच्या कॅप्शनमध्ये ‘हे बंधन तुटू देऊ नका...कारण..बहुत कुछ होता है’ असे लिहिले आहे.