Nagpur: हेल्मेट न घातल्याने हटकले, पोलिसाने तरुणाच्याच लगावली कानशिलात; व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:02 IST2025-04-11T13:00:07+5:302025-04-11T13:02:10+5:30
Nagpur police Video: विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाला एक तरुणाने हटकले. पोलिसाने त्याला जवळ बोलवून दोन कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे.

Nagpur: हेल्मेट न घातल्याने हटकले, पोलिसाने तरुणाच्याच लगावली कानशिलात; व्हिडीओ होतोय व्हायरल
Nagpur News: नियमांवर बोट ठेवत एका तरुणाने पोलिसाला हेल्मेटवरून हटकलं. त्यानंतर त्या तरुणाला बाजूला बोलवून पोलिसाने दोन कानाखाली मारल्या. नागपूर शहरामध्ये ही घटना घडली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोकांनी पोलिसांच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावरून जात असताना एक पोलीस विना हेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे तरुणाला दिसले. त्याने हेल्मेट न घातल्यावरून पोलिसाला हटकले. तुम्ही हेल्मेट का घातलं नाही?, असे तरुण म्हणाला.
पोलिसाने जवळ बोलवून केली मारहाण
तरुणाने प्रश्न विचारल्यानंतर पोलिसाने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर तरुणाला बोलवले. तरुण जवळ गेल्यानंतर पोलीस गाडीवरून उतरला आणि हेल्मेटवरून हटकणाऱ्या तरुणाच्या दोन कानाखाली मारल्या. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
वाचा >बँकेनं कर्ज नाकारलं, संतापलेल्या तरुणानं केलं असं काही, ऐकून पोलीसही चक्रावले!
मारहाण केल्यानंतर पोलीस तरुणाला म्हणतो की, माझा दात दुःख आहे. त्यामुळे हेल्मेट घातलं नाही, असे पोलीस तरुणाला म्हणतो. महत्त्वाचं म्हणजे तरुणाने पोलिसाला शिव्या दिल्याचे व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत नाही. पण, पोलीस शिव्या का देतो असा आरोप करत आहे.
मारहाण केल्यानंतर घातलं हेल्मेट
तरुणासोबत हुज्जत घातल्यानंतर पोलीस गाडीवर बसतो आणि अडकवलेलं हेल्मेट काढतो. त्यानंतर तो हेल्मेट घालतो. आनंद सिंह असं या पोलिसाचे नाव आहे. हेल्मेटबद्दल विचारलं म्हणून मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हा व्हिडीओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहे. एका व्यक्तीने म्हटलं आहे की, 'सामान्य नागरिकाचे दात दुखत असल्यास अशी सूट मिळणार का?'
दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं आहे की, 'तुम्हाला असे बरेच प्रकरण आढळतील, जिथे ते हेल्मेट घालत नाहीत. सीट बेल्ट घालत नाहीत. गाडी चालवताना मोबाईलवर बोलतात. चुकीच्या दिशेने गाडी चालवतात. सिग्नल तोडतात."