शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:46 IST

भूखंड माफियांचे कोट्यवधींच्या फसवणुकीचे रॅकेट : वाठोडा ठाण्याची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट नोंदणीच्या आधारे गृहकर्ज घेऊन बँकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. पोलिसांनी 'एआय'च्या मदतीने सूत्रधारासह पाच जणांना अटक केली आहे. आतापर्यंत पाच कोटींच्या फसवणुकीची प्रकरणे समोर आली असली तरी या टोळीने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असल्याने हा आकडा वाढू शकतो. वाठोडा पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती परिमंडळ चारच्या उपायुक्त रश्मिता राव यांनी दिली.

या प्रकरणात नीलेश मनोहर पौनीकर (३१, न्यू डायमंडनगर, नंदनवन) हा सूत्रधार असून संदीप चांदराव निंभोरकर (३६, विनायकनगर, हुडकेश्वर), इशान बळीराम वाटकर (३७, वाठोडा), इम्रान अली अख्तर अली हाश्मी (४६, आर्यनगर, जरीपटका) आणि अजय वामनराव पाठराबे (४१, भारत माता चौक, रेशमओळी, इतवारी) हे आरोपी आहेत. व्यापारी धनंजय जैन यांचे पुण्यातील नातेवाईक नीरज सोईतकर यांचा खरबी येथे फ्लॅट होता. नीरज यांनी फ्लॅट विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. धनंजय खरेदीदारांना फ्लॅट दाखवत असे. नीलेश आणि संदीप यांनी  धनंजय यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी फ्लॅट खरेदी करण्याचे आमिष दाखवून मूळ कागदपत्रांची झेरॉक्स काढली. इम्रानने फ्लॅटची बनावट रजिस्ट्री तयार केली. यामध्ये फ्लॅटचा मूळ मालक सोईतकरऐवजी अजय पाठराबेचा फोटो लावण्यात आला. सोईतकर यांच्या नावाने पाठराबे याचे बनावट आधार आणि पॅन कार्ड बनवण्यात आले. नागपूर नागरिक सहकारी बँकेत सोईतकर यांच्या नावाने खातेही उघडण्यात आले. त्या फ्लॅटची इशान वाटकर याच्या नावावर रजिस्ट्री करण्यात आली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बनावट रजिस्ट्री गहाण ठेवून इशानने ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. कर्जाची रक्कम सोईतकर यांच्या नावाने उघडलेल्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली. ही रक्कम त्यानंतर आरोपींनी वाटून घेतली. फसवणुकीची माहिती मिळताच सोईतकर यांच्या वतीने धनंजय जैन यांनी वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांना या रॅकेटची माहिती मिळाली. वाठोडा पोलिसांनी या रॅकेटपर्यंत पोहोचण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. सोशल मीडियावरून पोलिसांना नीलेशच्या कुटुंबाची माहिती मिळाली. मुलाचा फोटो मिळाल्यावर त्यांना गणवेशावरून त्याचा शाळेचा पत्ता सापडला. त्यामुळे नीलेशपर्यंत पोहोचणे सोपे झाले. ही कारवाई पोलिस उपायुक्त रश्मिता राव, सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हरीश बुराडे, अमोल पाटील, सचिन ठाकरे, प्रणाली बेनके, कैलाश श्रावणकर यांच्या पथकाने केली. 

हप्ते थकल्याने समोर आला गैरप्रकारबनावट खरेदीदार उभा करीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या हप्ते थकल्याने बँकेने घर गाठल्यानंतर या फसवणुकीचा उलगडा झाला. अशाच पद्धतीने या टोळीने शहरात ११ ठिकाणी बनावट खरेदीदार आणि विक्रेता उभा करीत बँकांची ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आतापर्यंत केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यांनी आणखी किती जणांची फसवणूक केली, याचा शोध घेतला जात असल्याची माहिती रश्मिता राव यांनी दिली. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी