नागपुरात विषारी सुपारीची तस्करी धडाक्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:03 PM2019-01-23T23:03:43+5:302019-01-23T23:09:06+5:30

कर्नाटक राज्यात जाणारी ४५ लाख रुपयांची सुपारी पकडण्याच्या प्रकरणानंतर पुन्हा शहरात विषारी सुपारीचा व्यवसाय धडाक्यात सुरू असल्याचा खुलासा झाला आहे. एफडीए आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संचालित या तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.

In Nagpur, the poisonous supari is being smuggled | नागपुरात विषारी सुपारीची तस्करी धडाक्यात सुरू

नागपुरात विषारी सुपारीची तस्करी धडाक्यात सुरू

Next
ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळाएफडीए उदासीनबेलतरोडी पोलिसांच्या कारवाईने खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्नाटक राज्यात जाणारी ४५ लाख रुपयांची सुपारी पकडण्याच्या प्रकरणानंतर पुन्हा शहरात विषारी सुपारीचा व्यवसाय धडाक्यात सुरू असल्याचा खुलासा झाला आहे. एफडीए आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संचालित या तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.
न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करून विषारी सुपारीची तस्करी धडाक्यात सुरू आहे. कारवाईबाबत एफडीएचे अधिकारी उदासीन आहेत. बेलतरोडी पोलिसांनी सोमवारी रात्री सुपारीचा ट्रक पकडला होता. ट्रकमध्ये २९ टन सुपारी होती. सुपारी गुरू ट्रेडर्सकडून कर्नाटक येथे पाठविण्यात येत होती. भंडारा रोड, ट्रान्सपोर्टनगर येथील मंजूनाथ रोड लाईन्सच्या ट्रकने सुपारी कर्नाटक येथे पाठविण्यात येत होती. याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातून दररोज कोट्यवधी रुपयांची विषारी सुपारी दुसऱ्या राज्यात पाठविण्यात येते. या व्यवसायासाठी नागपूर मोठी बाजारपेठ आहे. सुपारीला इंडोनिशियातून आयात करण्यात येते. या सुपारीची विक्री आणि साठवणुकीवर प्रतिबंध आहे. त्यानंतरही एफडीए आणि अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुपारी तस्करी करण्यात येत आहे. विषारी सुपारीच्या सेवनाने लोकांना कॅन्सरसारखा गंभीर आजार होत आहे. याची गंभीर दखल घेत यापूर्वी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर एफडीए, पोलीस आणि अन्य विभागात खळबळ उडाली होती. त्यानंतर सुपारीच्या तस्करीत लिप्त लोकांची धरपकड सुरू झाली. पण काही कारणांमुळे काही दिवसानंतर स्थिती सामान्य झाली.
विषारी सुपारीचे गोडाऊन कळमना, लकडगंज, वाडी, हिंगणा, बुटीबोरी ठाण्यांतर्गत असून येथे कोट्यवधी रुपयांची सुपारी ठेवण्यात येते. या गोडाऊनची एफडीए आणि संबंधित विभागाला माहिती आहे, पण कुणीही कारवाई करीत नाही. विषारी सुपारीच्या व्यावसायिकांकडून नेते आणि गुन्हेगार वसुली करतात. याची तक्रार वेळोवेळी करण्यात आली आहे. बेलतरोडी पोलिसांना याची सूचना एका नेत्याने दिली होती. सुपारी व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यामागे सरकारी विभागातील दलाल काम करीत आहेत. ते व्यापारी आणि अधिकाऱ्यांमध्ये सेतूचे काम करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने इतवारी येथील खासगी लॉकरवर कारवाई केल्यानंतर सुपारी व्यापारी चर्चेत आले होते. आयकर विभागाच्या चौकशीत बहुतांश लॉकर सुपारी व्यापाऱ्यांचे असल्याचे उजेडात आले होते. लॉकरमध्ये कोट्यवधी रुपये आणि दागिने ठेवले होते.
अनेक व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या नावावर लॉकर घेतले होते. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय लॉकर संचालित करीत आहेत. या कारवाईत सुपारी व्यापाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यावेळी व्यापाऱ्यांनी सुपारी बोलविणे बंद केले होते.
बेलतरोडी पोलिसांच्या कारवाईत पकडण्यात आलेल्या सुपारीचे नमुने एफडीएने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून या गोरखधंद्यात लिप्त व्यापाऱ्यांना अहवालाचा स्रोत माहिती होतो. त्यामुळे अनेकदा अहवाल त्यांच्या बाजूला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title: In Nagpur, the poisonous supari is being smuggled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.