नागपुरात चिमुकलीसोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्यास झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 21:53 IST2017-12-16T21:52:59+5:302017-12-16T21:53:56+5:30

नऊ वर्षाच्या चिमुकलीसोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपीला शेजाऱ्यांनी चोप दिला.

In Nagpur, A person who doing shameful behavior with minor girl was assaulted by public | नागपुरात चिमुकलीसोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्यास झोडपले

नागपुरात चिमुकलीसोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्यास झोडपले

ठळक मुद्देदार बंद करून कुकर्म करण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमत
नागपूर : नऊ वर्षाच्या चिमुकलीसोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपीला शेजाऱ्यांनी चोप दिला. आसिफ खान जाहिद खान (वय १८) असे आरोपीचे नाव आहे. तो यशोधरानगरात राहतो.
आरोपी आसिफच्या बाजूला एक परिवार राहतो. शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता त्याने या परिवारातील नऊ वर्षीय बालिकेला आपल्या घरात नेले आणि दार बंद करून तिच्यासोबत कुकर्म करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्याने त्याच्या कुकृत्याचा भंडाफोड झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला बेदम चोप दिला. पीडित मुलीच्या पालकांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून आरोपी आसिफविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

 

Web Title: In Nagpur, A person who doing shameful behavior with minor girl was assaulted by public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.