‘नागपूर पॅटर्न’ला एक वर्ष उशीर

By Admin | Updated: November 18, 2014 00:49 IST2014-11-18T00:49:40+5:302014-11-18T00:49:40+5:30

गंगा नदीला ‘नागपूर पॅटर्न’वर स्वच्छ बनविण्याची योजना असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नागपुरात अलीकडेच केली. गंगा स्वच्छतेच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे नागपूर नेतृत्व करेल,

'Nagpur Pattern' one year delayed | ‘नागपूर पॅटर्न’ला एक वर्ष उशीर

‘नागपूर पॅटर्न’ला एक वर्ष उशीर

दूषित पाण्यापासून वीजनिर्मिती : रेल्वेच्या मंजुरीला उशीर
कमल शर्मा - नागपूर
गंगा नदीला ‘नागपूर पॅटर्न’वर स्वच्छ बनविण्याची योजना असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नागपुरात अलीकडेच केली. गंगा स्वच्छतेच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे नागपूर नेतृत्व करेल, ही नागपूरसाठी अभिमानाची बाब आहे. पण उमा भारती यांची घोषणा ही अन्य राजकीय नेत्यांप्रमाणेच केवळ घोषणाच ठरली आहे.
उमा भारती यांच्या घोषणेत ‘नागपूर पॅटर्न’ काय आहे, याची माहिती करून घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. महाजेनकोच्या कोराडी येथील औष्णिक वीज केंद्राच्या विस्तारित प्रकल्पाला पाणी उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेंतर्गत नैसर्गिक स्रोताऐवजी नागनदीच्या दूषित पाण्याचा उपयोग वीज केंद्रातील तीन युनिटला होणार आहे. ६६० मेगावॅट क्षमतेच्या या युनिटमधून राज्याला १९८० मेगावॅट वीज मिळणार आहे. योजनेचे काम सुरू झाले असून २२ मार्च २०१४ पर्यंत पूर्ण व्हायचे होते. पण ते अद्यापही अपूर्ण आहे. रेल्वे क्रॉसिंगमुळे काम थांबले आहे. सुमारे १०० मीटरपर्यंत पाईपलाईनचे काम थंडबस्त्यात आहे. या कामासाठी रेल्वेकडून परवानगी मिळाल्याचे महाजेनकोचे मुख्य अभियंता प्रमोद नाफडे यांनी सांगितले. हे काम फेब्रुवारी किंवा मार्च २०१५ पर्यंत पूर्ण होईल. अर्थात या कामाला एक वर्ष उशीर होणार आहे.
काय आहे योजना
देशात पहिल्यांदा कोणत्याही औष्णिक वीज केंद्रात शहरातील दूषित पाण्याचा उपयोग होणार आहे. महाजेनकोने कोराडी येथे प्रस्तावित १९८० मेगावॅटच्या विस्तारित प्रकल्पासाठी शहरातील दूषित पाण्याच्या उपयोग करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. मनपाच्या सहकार्याने साकार होणाऱ्या प्रकल्पांतर्गत भांडेवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र स्थापन करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येत आहे. नागनदीतील दूषित पाणी शुद्ध होईल आणि नैसर्गिक स्रोताचे पाणी उपयोगी येणार नाही, हे या प्रकल्पाचे दोन फायदे आहेत.
पाणी कसे पोहोचणार
१९० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाजेनकोने २७ जुलै २०१२ ला मनपाकडून भांडेवाडी येथील १३ एकर जागेचे अधिग्रहण केले आहे. प्रारंभी महाजेनको हिवरीनगर येथे एक छोटा बंधारा बांधून नागनदीचे पाणी अडविण्यात येणार आहे. ते पंपाच्या मदतीने भांडेवाडी येथे आणण्यात येईल आणि तिथे महाजेनको आपल्या जलशुद्धीकरण केंद्रात या पाण्याला शुद्ध करेल. या ठिकाणावरून १६ कि़मी.च्या १२०० एमएम पाईपलाईनद्वारे पाणी कोराडी येथे नेण्यात येणार आहे.
काम कुठे अडले
महाजेनकोचे पम्पिंग स्टेशन आणि कार्यालय भांडेवाडी येथे तयार होत आहे. महाजेनकोची पाईपलाईन भांडेवाडी ते हिवरीनगर, एचबी टाऊन भंडारा रोड, कळमना उड्डाणपूल आणि त्यानंतर कंपनीच्या रेल्वे सायडिंगच्या बाजूने कोराडी येथे पोहोचणार आहे. या रेल्वे सायडिंगमुळे काम थांबले आहे. सर्वात मोठी अडचण रेल्वेची आहे. मनपा, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाच्या मंजुरीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
दहा वर्षांची व्यवस्था
मनपाशी झालेल्या करारानुसार महाजेनकोला भांडेवाडी शुद्धीकरणाचा उपयोग १० वर्षांपर्यंत करता येईल. पाण्याच्या उपयोगासाठी महाजेनको मनपाला दरवर्षी १५ कोटी रुपये देईल.

Web Title: 'Nagpur Pattern' one year delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.