नागपूर की ‘भट्टी’पूर : नवतपाच्या झळांनी शहर तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:37 PM2019-05-27T22:37:51+5:302019-05-27T22:53:32+5:30

रविवारनंतर सोमवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. सोमवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शिवाय या मोसमातील नागपुरातील हा सर्वाधिक उष्ण दिवसदेखील ठरला. नवतपा सुरू झाल्यानंतर दररोज तापमानात वाढ होत असून २९ तारखेपर्यंत पारा ४७ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

Nagpur or 'Bhatti'pur: The city was hot by the waves of Nawatapa | नागपूर की ‘भट्टी’पूर : नवतपाच्या झळांनी शहर तापले

नवतपा ४६.७ वर : नवतपाच्या तिसºया दिवशी नागपूरवर सूर्य अक्षरश: आगच ओकत होता. तापमानाचा पारा होता ४६.७ अंशावर. सध्या सुरू असलेल्या प्रचंड उन्हामुळे व उकाड्याने जीवाची लाहीलाही होत आहे. प्रचंड ऊन झेलण्याची सवय झालेले नागपूरकर झळांच्या सानिध्यात अमरावती रोडवरील सिग्नलवर असे उभे होते.

Next
ठळक मुद्देनागपूर @ ४६.७ : पारा जाणार ४७ अंश सेल्सिअस पार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारनंतर सोमवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. सोमवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शिवाय या मोसमातील नागपुरातील हा सर्वाधिक उष्ण दिवसदेखील ठरला. नवतपा सुरू झाल्यानंतर दररोज तापमानात वाढ होत असून २९ तारखेपर्यंत पारा ४७ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
मे महिना सुरू झाल्यानंतर सातत्याने नागपूरचे तापमान वाढत आहे. मागील आठवडाभरापासून तर उष्णतेने अंगाची लाही लाही होत आहे. सोमवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवायला लागला होता. शहरात ४६.७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान सरासरीहून तीन अंशांनी अधिक असून २४ तासातच तापमानात ०.२ अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. दुपारनंतर उपराजधानीच्या आकाशात काही प्रमाणात ढग दिसून आल्यामुळे उष्णता थोडी कमी होईल असे वाटत होते. परंतु पारा आणखी वाढला. रात्री उशिरापर्यंत उष्ण वारे वाहतच होते. घरांमध्ये नागरिकांना कूलरमुळेदेखील दिलासा मिळाला नाही. त्यातच अनेक ठिकाणी भारनियमन असल्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिक तर अक्षरश: हैराण झाले होते.
नागपूरकरांसाठी परीक्षेचा आठवडा
हवामान विभागातर्फे विदर्भात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात उष्णता कायम राहील व तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वाढत्या तापमानामुळे अगोदरच हैराण होत असलेल्या उपराजधानीतील नागरिकांसाठी पुढील काही दिवस परीक्षेचे ठरू शकतात. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २९ मे पर्यंत पारा ४७ अंशांहून अधिक जाऊ शकतो.

तारीख            तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२० मे              ४४.२
२१ मे              ४५.६
२२ मे             ४६.०
२३ मे             ४६.२
२४ मे             ४६.०
२५ मे             ४६.३
२६ मे            ४६.५
२७ मे            ४६.७

विदर्भातील तापमान
केंद्र                                कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
नागपूर                           ४६.७
ब्रम्हपुरी                          ४६.७
वर्धा                               ४६.५
चंद्रपूर                           ४६.४
गडचिरोली                     ४५.८
अकोला                         ४५.३
अमरावती                      ४५.०
यवतमाळ                      ४५.०
गोंदिया                          ४४.८
वाशीम                         ४३.८
बुलडाणा                      ४१.५

मे महिन्यातील सर्वाधिक तापमान
तारीख               तापमान
२३ मे २०१३        ४७.९
२३ मे २००५       ४७.६
२ मे २००९         ४७.४
२५ मे २०१०       ४७.३

Web Title: Nagpur or 'Bhatti'pur: The city was hot by the waves of Nawatapa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.