नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने केली सरकारची चौदावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:52 IST2018-11-02T00:49:45+5:302018-11-02T00:52:12+5:30
भाजप सरकारने गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संविधान चौकात सरकारची चौदावी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी होमहवन करीत नागरिकांना चौदावीचे जेवणही देण्यात आले.

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने केली सरकारची चौदावी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप सरकारने गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.
राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संविधान चौकात सरकारची चौदावी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी होमहवन करीत नागरिकांना चौदावीचे जेवणही देण्यात आले. या आगळ्यावेगळ्या आंदोलनात संतोष नरवाडे, शोएब असद, संजय पाटील, अविनाश तिरपुडे, शैलेंद्र तिवारी, महेंद्र्र भांगे, विजय गजभिये, अमोल वासनिक, अब्दुल शाहीद, रुद्रा धाकडे, रोशन भिमटे,विलास मालके, राहुल वाडेकर, प्रवीण बावणे, सलीम शेख, दीपक वाहणे, सुरेश शेंडे, अजय चैेरे, नरेश सोमकुंवर, अरुण बगले, गणेश नायडू, दिलीप बैस, विलास मालके, अशोक रंगारी, ईश्वर चव्हाण, केवल बावणे, सुभाष भंडारकर, भोला जैस्वाल, शैलेश गोलाईत, राजू रंगारी, कुंदन कापसे, प्रकाश कापसे, तन्ने पटेल, आरिफ शेख आदी उपस्थित होते.