शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

नागपुरात मेट्रोच्या वाहनाने मजुरास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:58 IST

मेट्रो रेल्वे प्रकल्पातील काँक्रिट मिक्सरच्या वाहनाने एका मजुराचा मृत्यू झाला. या अपघातात इतर चार मजूर थोडक्यात बचावले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे प्रकल्पाशी संंबंधित मजूर हादरले आहेत.

ठळक मुद्देथोडक्यात वाचले इतर साथीदार : राहाटे चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पातील काँक्रिट मिक्सरच्या वाहनाने एका मजुराचा मृत्यू झाला. या अपघातात इतर चार मजूर थोडक्यात बचावले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे प्रकल्पाशी संंबंधित मजूर हादरले आहेत. दुखू बुधू गोराईत (३१) रा. पुरुलिया, पश्चिम बंगाल असे मृत मजुराचे नाव आहे.वर्धा रोडवरील राहाटे कॉलनी चौकात मेट्रो रेल्वे स्टेशनचे काम सुरू आहे. दुखू आणि त्याचे साथीदार मंगळवारी रात्री येथे काम करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत काम चालत होते. काम संपल्यानंतर दुखू आपल्या साथीदारासह काम सुरू असलेल्या ठिकाणीच झोपला. पहाटे ३.४५ वाजता काँक्रिट मिक्सर वाहन क्रमांक एमएम ४०/बी.जी./८१३७ चा चालक गाडी रिव्हर्स घेत होता. दुखू गाडीखाली आला. इतर मजूर आवाज ऐकताच पळाले. दुखूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कंत्राटदार आणि मेट्रो प्रकल्पातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. धंतोली पोलिसांना सूचना देण्यात आली.सूत्रानुसार दुखू आणि त्याचे साथीदार मेट्रो पुलाखाली एका सुरक्षित जागेवर झोपले होते. काँक्रिट मिक्सर रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा करण्यात आला. गाडी रिव्हर्स घेत असताना कंडक्टर किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यत आले नव्हते. त्यामुळे चालकास मजूर झोपले असल्याचे त्याला माहिती पडले नाही. आवाज झाला नसता तर दुखूसह त्याच्या साथीदारांनाही जीव गमवावा लागला असता. ही घटना दाबण्यासाठी घटनास्थळी उपस्थित लोकांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मजुरांशी बोलण्याबाबतही मनाई करण्यात आली आहे.दुखूचे कुटुंबीय पश्चिम बंगालमध्ये राहतात. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर उपाशी मरण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन दिवसात मेट्रो प्रकल्पातील हा दुसरा अपघात आहे. सोमवारी सेंट्रल एव्हेन्यूवरील टेलिफोन एक्सचेंजजवळ प्रशांत सोनटक्के याला मनपा वाहनाने चिरडले होते. या अपघातात लकडगंज पोलिसांनी वाहन चालक आणि बीएसएनएल ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील रस्ता अरुंद झाला आहे. बीएसएनएलद्वारा खड्ड्यातून काढलेल्या मातीवरून घसरल्याने प्रशांत गाडीखाली आला होता.तीन दिवसात सहा मृत्यूतीन दिवसात रस्ते अपघातात एका तरुणीसह सहा लोकांचा जीव गेला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत परसली आहे. वाहतूक डीसीपी गजानन राजमाने वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कडक पाऊल उचलत आहेत. यासाठी अवैध प्रवासी वाहने आणि बुलेट चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक विभागाने या अपघातांना गांभीर्याने घेतले आहे.टँकर पलटला, चालकाचा मृत्यूकेमिकलचा टँकर पलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. सुरेंद्र येडपाचे (४८) रा. नीलडोह असे मृताचे नाव आहे. सुरेंद्र बुधवारी सकाळी केमिकलचा टँकर घेऊन एमआयडीसीतील अमरनगर येथून जात होते. नियंत्रण सुटल्याने टँकर पलटला. यात सुरेंद्र गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

साईट अभियंता निलंबित

 घटनेचे गांभीर्य पाहता एनसीसी व्यवस्थापनाने बेजबाबदारीच्या कारणाने साईट अभियंता राजीव झा याला निलंबित केले आहे. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना महामेट्रो प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एनसीसी कंपनीने मृताच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची अंतरिम मदत केली आहे. आवश्यक कागदपत्रांच्या प्रकियेनंतर आणखी मदत करण्यात येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोAccidentअपघातDeathमृत्यू