शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

९० किमी ताशी वेगाने धावणार नागपूरची मेट्रो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:50 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच नागपूर मेट्रोची प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार असून ताशी ९० किलोमीटर वेगाने मेट्रो ट्रेन धावणार आहे.

ठळक मुद्दे खापरी ते साऊथ एअरपोर्ट : ‘जॉय राईड’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच नागपूर मेट्रोची प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार असून ताशी ९० किलोमीटर वेगाने मेट्रो ट्रेन धावणार आहे.प्रस्तावित मेट्रो मार्गावरील स्थानकावरील कार्यदेखील अंतिम टप्प्यात आहे. त्याचीही पाहणी महामेट्रोद्वारे केली जात आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत करणारी नागपूर मेट्रो आता शहरातील सर्वाधिक गती प्रदान करणारी वाहतूक सेवा ठरणार आहे. सुरुवातीला माझी मेट्रो वर्धा महामार्गावर खापरी ते साऊथ एअरपोर्टदरम्यान धावणार आहे. तेव्हा ५ किलोमीटरचा हा दैनंदिन प्रवास यात्रेकरूंना करता येणार आहे.नागपूरकरांना ‘जॉय राईड’च्या माध्यमातून मेट्रो प्रवासाचा आनंद मिळावा, याकरिता हैदराबाद येथून रोलिंग स्टॉक नागपूरला आणण्यात आले. त्या रोलिंग स्टॉकमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले. आधुनिक सीबीटीसी सिग्नल प्रणाली बसविण्यात आली. मेट्रो जॉय रॉईड खापरी मेट्रो स्थानकापासून सुरू होऊन साऊथ एअरपोर्टपर्यंत धावेल. या दरम्यान न्यू-एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर एक स्टॉप राहील. या जॉय राईडदरम्यान मेट्रो गाडीचा ताशी वेग २५ किमी इतका राहील. यातून मेट्रो प्रवाशांचा अनुभव आणि त्यांच्या गरजा लक्षात घेता महामेट्रोला भविष्यात आणखी काही उपाययोजना करता येईल. ही सेवा पुढे सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्थानकापर्यंत वाढविण्यात येणार आहे. या ठिकाणी लवकरच रुळांचे आणि सिग्नलिंग प्रणालीचे कार्य पूर्ण होताच या मार्गावर देखील प्रवासी वाहतूक सुरू होईल. मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू असल्यामुळे नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर