नागपुरात अचानक उलटली मेट्रोच्या कामातील क्रेन: मोठा अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 23:06 IST2021-05-22T23:04:25+5:302021-05-22T23:06:05+5:30
Metro crane suddenly overturned मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येत असलेली क्रेन अचानक उलटल्याने सीए रोडवरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

नागपुरात अचानक उलटली मेट्रोच्या कामातील क्रेन: मोठा अनर्थ टळला
ठळक मुद्देदोन मजूर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येत असलेली क्रेन अचानक उलटल्याने सीए रोडवरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. या क्रेनद्वारे पेंटींगचे काम करण्यात येत होते. काम करीत असताना अचानक क्रेन उलटल्याने दोन्ही मजूर खाली पडून जखमी झाले. रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असली तरी या घटनेत कुठलेही वाहन क्षतीग्रस्त झाले नाही. अग्रसेन चौकापासून काहीच अंतरावर ही घटना घडली. रात्री ९ वाजताच्या सुमारास उभी असलेली ही क्रेन अचानक उलटली. दोन मजूर ५० फूट उंचीवर पेंटींग करीत होते. क्रेन उलटल्याने ते जोरदार पडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.