नागपूर : उधार देणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी सत्तूरने केले जखमी
By योगेश पांडे | Updated: April 12, 2023 16:37 IST2023-04-12T16:37:06+5:302023-04-12T16:37:22+5:30
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपूर : उधार देणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी सत्तूरने केले जखमी
नागपूर : अडचणीच्या वेळेत उसने पैसे देणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून लोखंडी सत्तूरने त्याला जखमी करण्यात आले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
दिपेश वर्मा (३२, विजयनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. आरोपी गोपालसिंह उर्फ गोपु भारत राजपूत (३४) हा त्याच वस्तीत राहतो. दिपेशने गोपुला वेळोवेळी पैशांची मदत केली. दिपेशचे ६० हजार रुपये अद्यापही गोपुकडेच आहेत. ११ एप्रिल रोजी रात्री १० वाजता दिपेश सहज गोपुच्या घरासमोर गेला व त्याला आवाज देऊन बाहेर बोलविले.
बोलताबोलता दिपेशने त्याला उधार दिलेले पैसे परत मागितले. यावर गोपु संतापला व त्याने आज तू खूप जास्त बोलत आहे, तुला अद्दल घडवतो असे म्हणून तो घरात गेला. त्याने घरातून लोखंडी सत्तूर आणत दिपेशच्या डोके, पाठ व हातावर वार केले. यात दिपेश गंभीर जखमी झाला. वस्तीतील लोकांनी त्याला मेयो इस्पितळात दाखल केले. दिपेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपुविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.