लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेब्रुवारी महिन्यात शहरातील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर राहिल्याचे समोर आले आहे. विशेषतः महाल परिसर सर्वाधिक प्रदूषित ठरला असून, बहुतांश दिवस हवेची गुणवत्ता 'मध्यम' ते 'वाईट' श्रेणीत नोंदवली गेली. एकूणच, विदर्भातनागपूर हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.
महाल येथे २८ दिवसांपैकी ६ दिवस हवा 'वाईट' होती. २२ दिवस मध्यम प्रदूषित श्रेणीत होती. धूलिकणांमध्ये २४ दिवस सूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) तर ४ दिवस मोठे धूलिकण (पीएम१०) आढळले, ज्यामुळे आरोग्याचा धोका वाढला आहे. जीपीओ परिसरात फक्त १ दिवस समाधानकारक ठरला. उर्वरित २ दिवस 'वाईट' आणि २५ दिवस 'मध्यम' स्तरावर प्रदूषण राहिले. येथे १९ दिवस पीएम २.५ तर ९ दिवस पीएम-१० कणांचे प्रमाण अधिक होते.
रामनगर भागातही १ दिवस समाधानकारक हवा होती, तर २ दिवस 'वाईट' आणि २५ दिवस 'मध्यम' श्रेणीत हवा नोंदवली गेली. येथे १५ दिवस पीएम-२.५ आणि १३ दिवस पीएम-१० धूलिकण आढळले. अंबाझरी परिसरात ३ दिवस समाधानकारक हवा होती. मात्र, २ दिवस 'वाईट' आणि २३ दिवस 'मध्यम' प्रदूषण राहिले. येथे १८ दिवस पीएम-२. आणि १० दिवस पीएम १० कण नोंदवले गेले.
आरोग्याचा वाढता धोका
तज्ज्ञांच्या मते, पीएम-२.५ सारखे सूक्ष्म धूलिकण फुप्फुसांमध्ये खोलवर जाऊन श्वसनाचे आजार, दमा आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर, बाहेर जाण्याचे प्रमाण कमी करणे आणि संवेदनशील गटांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Web Summary : Nagpur's air quality was alarming in February, especially in Mahal, with mostly 'moderate' to 'poor' air quality. High PM2.5 and PM10 levels pose health risks. Experts advise precautions like masks and limiting outdoor activity.
Web Summary : फरवरी में नागपुर की वायु गुणवत्ता खतरनाक थी, खासकर महाल में, जहाँ ज्यादातर 'मध्यम' से 'खराब' वायु गुणवत्ता थी। उच्च PM2.5 और PM10 स्तर स्वास्थ्य के लिए खतरा पैदा करते हैं। विशेषज्ञ मास्क और बाहरी गतिविधि को सीमित करने जैसी सावधानियां बरतने की सलाह देते हैं।