लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगनाडे चौक येथील कुख्यात गुन्हेगार आशुतोष ऊर्फ आशु अवस्थी याला त्याच्या एका साथीदारासह पिस्तुल राऊंड व चाकूसारख्या प्राणघातक शस्त्रासह पोलिसांनी गुरुवारी अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या पोलीस पथकाने ही कामगिरी केली.गुन्हेशाखा पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारावर धाड टाकली. गुरुवारी रात्री जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये कुख्यात गुन्हेगार आशुतोष हा त्याचा साथीदार शुभम गौर रा. सिरसपेठसोबत ९७११ क्रमांकाच्या ऑडीकारमध्ये बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ऑडी कारमधून एक विदेशी स्टील, ७ जिवंत काडतूस, १ लोखंडी चाकू सापडला. आरोपी एखाद्या गुन्ह्याची योजना आखत होते. पोसिांनी दोघांना अटक करून कारसह इतर वस्तू जप्त केल्या. आशुतोष हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत.
नागपुरात कुख्यात आरोपींना पिस्तुलासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:23 IST