शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ, कोल्हापूर पोलिस नागपूरकडे, कोणत्याही क्षणी अटक

By दयानंद पाईकराव | Updated: February 26, 2025 21:42 IST

Nagpur News: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूरचे प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- दयानंद पाईकराव  नागपूर -  इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूरचे प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक कोरटकरला अटक करण्यासाठी बुधवारी नागपूरकडे रवाना झाले आहे, परंतु कोरटकर गत दोन दिवसांपासून फरार असून, त्याचा फोनही बंद असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली. दरम्यान बुधवारी सकाळी सकल मराठा समाज व शिवप्रेमींनी बेसाच्या सर्व्हर प्रोसेस सोसायटी येथील कोरटकर याच्या घरासमोर आंदोलन करून त्याच्या अटकेची मागणी केली.

छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला मुकबर खानाकडे कुणी पकडून दिले, ही मांडणी सावंत यांनी केली होती. त्यावरून कोरटकर यांनी सोमवारी २३ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता सलग दोनवेळा फोन करून सावंत यांना धमकावले. सावंत यांनी त्या संभाषणाची क्लिप मंगळवारी सोशल मीडियावर टाकली आणि खळबळ उडाली होती.या क्लिपमध्ये कोरटकरने, तुम्ही कोल्हापुरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा, आमची ताकद कमी लेखू नका. तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्री आणि शासनामध्येच आहात, हे विसरू नका. याद राखा अशी ब्राह्मण विरोधी वक्तव्ये करू नका. एक दिवस तुम्हाला आमची औकात दाखवून देऊ. आम्हाला काही बोललात, तर घरात घुसून मारू, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी बुधवारी कोल्हापूर पोलिसांचे पथक कोरटकरला अटक करण्यासाठी नागपूरकडे निघाले. ते रात्री उशिरापर्यंत नागपुरात दाखल होतील, परंतु कोरटकर मागील दोन दिवसांपासून फरार असून त्याचा मोबाइल देखील बंद आहे. त्यामुळे सायबर पोलिस आणि गुन्हे शाखा पोलिस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती बेलतरोडी पोलिसांनी दिली. शिवप्रेमींचे काळे झेंडे घेऊन आंदोलनसकल मराठा समाज आणि शिवप्रेमींनी प्रशांत कोरटकर याच्या घरासमोर हातात काळे झेंडे घेऊन बुधवारी सकाळी १०:३० वाजता आंदोलन केले. १५ ते २० आंदोलकांनी नारेबाजी करीत कोरटकरच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर आंदोलनातील अमित जाचक, अशोक अंबरजे, सौरभ रसाळ, प्रदीप घोरपडे, संदीप चव्हाण यांनी झोन ४ च्या उपायुक्त रश्मीता राव, बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. कोरटकरच्या घराबाहेर बेलतरोडी ठाण्यातील एक उपनिरीक्षक आणि दोन अंमलदारांची ड्युटी लावण्यात आली आहे. कोरटकर मागील अदृष्य राजकीय शक्ती ठेचून काढा : मुधोजी राजे भोसलेछत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मागे अदृष्य शक्ती असल्यामुळे त्याची हिंमत वाढली आहे. छत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नसून, कोरटकरला दिसेल तिथे धडा शिकवा, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी बुधवारी सायंकाळी भोसला पॅलेसमध्ये आयोजित सकल मराठा महासंघाच्या बैठकीत घेतली. कोरटकर हा कार घेऊन पळाला, परंतु पोलिस त्याचा शोध घेऊ शकले नसून, पोलिसांची भूमिका तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत गुरुवारी पोलिस आयुक्तांना सकल मराठा महासंघातर्फे निवेदन देण्यात येणार आहे. बैठकीनंतर मुधोजी राजे भोसले यांच्या नेतृत्वात कोतवाली पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरkolhapurकोल्हापूर