शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नागपूरच्या  हवालाकांडात एपीआय सोनवणे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:06 IST

कुख्यात गुन्हेगारांना हाताशी धरून हवालाची अडीच कोटींची रोकड लुटणारा सहायक पोलीस निरीक्षक सुनील नारायण सोनवणे याला शनिवारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी निलंबित केल्याचे जाहीर केले. गेल्या रविवारी, २९ एप्रिलच्या पहाटे झालेल्या या गुन्ह्यामुळे हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. तर, राज्य पोलीस दलालाही यामुळे जबर हादरा बसला होता.

ठळक मुद्देकारमध्ये ५ कोटी ७३ लाख रुपये होते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुन्हेगारांना हाताशी धरून हवालाची अडीच कोटींची रोकड लुटणारा सहायक पोलीस निरीक्षक सुनील नारायण सोनवणे याला शनिवारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी निलंबित केल्याचे जाहीर केले.गेल्या रविवारी, २९ एप्रिलच्या पहाटे झालेल्या या गुन्ह्यामुळे हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. तर, राज्य पोलीस दलालाही यामुळे जबर हादरा बसला होता.छत्तीसगड, रायपूरमधून हवालाची रोकड घेऊन आलेली एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाची डस्टर कार प्रजापती चौकाजवळ नंदनवन पोलिसांनी अडवली होती. कारमधील ५ कोटी, ७३ लाखांपैकी २ कोटी, ५५ लाखांची रोकड पोलिसांचे साथीदार बनून आलेल्या चार गुन्हेगारांनी काढून घेतली. नंतर ही कार नंदनवन ठाण्यात आणून कारमधून ३ कोटी १८ लाखांची रोकड जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले होते.रायपूरहून (छत्तीसगड) मधील मॅपल ज्वेलर्सचे संचालक खजान ठक्कर यांनी ही रोकड नागपुरातील हवाला व्यावसायिक प्रशांत केसानी याच्याकडे पोहचवण्यासाठी पाठवली होती, अशी माहिती त्यावेळी कारचालक राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनिमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतिनगर, तुलसीनगर जैन मंदिराजवळ) या दोघांनी दिली होती. दरम्यान, कारमध्ये ५ कोटी ७३ लाख रुपये होते आणि त्यातील २ कोटी ५५ लाखांची रोकड लंपास झाल्याचा आरोप मनीष खंडेलवालने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतून नोंदवला होता. त्यामुळे या प्रकरणाला भलतेच वळण लागले. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी या प्रकरणाच्या प्रारंभापासूनच्या घडामोडींची कसून चौकशी केली असता नंदनवन ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे याने त्याच्या मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कुख्यात गुन्हेगार सचिन नारायण पडगिलवार, रवी रमेश माचेवार, गजानन भालेनाथ मुंगणे, आणि प्रकाश बबलू वासनिक यांच्याशी संगनमत करून कारमधील २ कोटी ५४ लाख, ९२ हजार ८०० रुपये लुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नंदनवन ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करून आरोपी पडगिलवार, माचेवार, मुंगणे आणि वासनिक या गुन्हेगारांसोबतच सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे, पोलीस कर्मचारी विलास भाऊराव वाडेकर आणि सचिन शिवकरण भजबुजे यांनाही अटक केली. वाडेकर आणि भजबुजेला शुक्रवारी तर, सोनवणेला आज निलंबित करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा