CoronaVirus in Nagpur : नागपुरात एका दिवशी सर्वाधिक १,२७० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 22:45 IST2020-08-26T22:44:52+5:302020-08-26T22:45:58+5:30
नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी सर्वाधिक १,२७० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यात नागपूर शहरातील १,०३१, ग्रामीण भागातील २३७ आणि नागपूर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. तर ४५ रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला.

CoronaVirus in Nagpur : नागपुरात एका दिवशी सर्वाधिक १,२७० पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी सर्वाधिक १,२७० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यात नागपूर शहरातील १,०३१, ग्रामीण भागातील २३७ आणि नागपूर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. तर ४५ रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील ३५, ग्रामीणचे ८ आणि जिल्ह्याबाहेरच्या २ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २३,४९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. तर ८५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी ६४१ रुग्ण बरे होऊ घरी गेले. आतापर्यंत एकूण १३,७०९ रुग्ण बरे झाले आहेत.
एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील १७,९६४, ग्रामीण भागातील ५,२६१ आणि जिल्ह्याबाहेरचे २७० आहेत. तर मृतांमध्ये शहरातील ६४८ , ग्रामीणचे १२३ आणि जिल्ह्याबाहेरचे ८८ रुग्ण आहेत. नागपुरात बुधवारी ६,६८० नुमन्यांची तपासणी करण्यात आली.
मेडिकलमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात कुही येथील ४५ वर्षीय महिला, रामेश्वरी येथील ८० वर्षी पुरुष, रामटेकेनगरातील ५८ वर्षीय पुरुष, लाकडीपूल येथील ६५ वर्षीय पुरुष, गिट्टीखदान येथील ४५ वर्षीय महिला, रेणुकामातानगर येथील ७५ वर्षीय पुरुष, लकडगंज येथील ६० वर्षीय पुरुष, हनुमाननगर येथील ४३ वर्षीय महिला, बेसा येथील ५२ वर्षीय पुरुष, मनीषनगर येथील ८७ वर्षीय पुरुष, तेलंगखेडी येथील ४७ वर्षीय पुरुष, दत्तवाडी येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. उर्वरित मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
अॅन्टिजेन टेस्टमध्ये ५३३ पॉझिटिव्ह
बुधवारी अॅॅन्टिजेन टेस्टमध्ये सर्वाधिक ५३३ नमुने पॉझिटिव्ह आले. याशिवाय खासगी प्रयोगशाळेत ३३६, एम्सच्या प्रयोगशाळेत ११२, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ६५, मेयोच्या प्रयोगशाळेत १४५ आणि माफसुच्या प्रयोगशाळेत ७९ नमुने पॉझिटिव्ह आले.
अॅक्टिव्ह ८,९२७
बरे झाले १३,७०९
मृत ८५९